एक्स्प्लोर

धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीवरील विजय : क्षीरसागर

विशेष म्हणजे या छोट्याशा सत्कार सोहळ्यामध्ये भारतभूषण यांनी दिलेली प्रतिक्रिया तर अतिशय बोलकी होती. ते म्हणाले की "सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर मिळवलेला विजय आहे."

बीड : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा 76 मतांनी विजय झाला. मात्र धस यांना मिळालेली मतं कुठून आली, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण या प्रश्नाच्या उत्तरामधील एक पदर एका फोटोमध्ये आहे. हा फोटो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबतचा. विजयानंतर भारतभूषण क्षीरसागर यांनी सुरेश धस यांचा सत्कार करुन गुलाल खेळला. यातूनच सुरेश धस यांना पडलेली विक्रमी मतं कुठून आली, या उत्तरातली एक चुणूक दिसून येते. विशेष म्हणजे या छोट्याशा सत्कार सोहळ्यामध्ये भारतभूषण यांनी दिलेली प्रतिक्रिया तर अतिशय बोलकी होती. ते म्हणाले की "सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर मिळवलेला विजय आहे." उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली. विधानपरिषद: संख्याबळ नसूनही सुरेश धस कसे जिंकले? राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर हे मागील वर्षभरापासून नाराज आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना या दोन्ही नेत्यांची कायम अनुपस्थिती असते. एकीकडे राष्ट्रवादीकडून पुतण्या संदीप क्षीरसागर यांना मिळणारं बळ तसंच बीडमध्ये धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांकडून क्षीरसागरविरोधी कृत्याला मिळणारं खतपाणी, यामुळेच जयदत्त आणि भारतभूषण क्षीरसागर हे मागील अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीवरील विजय : क्षीरसागर कालच्या पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यासाठी पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला. अर्थात जयदत्त क्षीरसागर मात्र या पूर्ण निवडणूक प्रक्रियेतून अलिप्त होते. पण असं असलं तरी भारतभूषण क्षीरसागर यांनी कालच सुरेश धस यांच्या सत्काराचा कार्यक्रम बीड नगरपालिकेमध्ये जाहीर केला. एवढंच नाही तर स्वतः सुरेश धस यांच्यासोबत भारतभूषण यांनी गुलाल ही खेळला. यावरुन स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नाराज नेत्यांमुळेच सुरेश धस यांना विजयाची लॉटरी लागली. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद : सुरेश धस विजयी  धनंजय मुंडे कितीही म्हणत असले की राष्ट्रवादी काँग्रेसचं एक ही मत फुटलेलं नाही तर मग प्रश्न उपस्थित होतो की इतक्या मोठ्या उत्सवांमध्ये सामील होणारे भारतभूषण आणि जयदत्त क्षीरसागर यांची मतं कोणाला पडली हे उघड सत्य आहे. मागे काही दिवसांमध्ये तर जयदत्त क्षीरसागर यांची भाजपाच्या नेत्यांशी म्हणजे पंकजा मुंडे आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली जवळीक लपून राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी जाऊन चहापाणी केलं, त्याचवेळी क्षीरसागर आणि भाजपा यांच्यातील संबंधाची उघड उघड चर्चाही झाली होती. उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक अंतिम निकाल 527 सुरेश धस 451 अशोक जगदाळे 25 बाद एकूण फरक 76 सुरेश धस विजयी घोषित ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget