एक्स्प्लोर
जलयुक्तच्या कामात अडीच कोटींचा घोटाळा, 138 ठेकेदारांवर गुन्हा
या पाहणीत कामं न करता बोगस बिलं उचलल्याचं निदर्शनास आलं. त्यावरुन यापूर्वी परळी आणि अंबाजोगाई कृषी कार्यालयाच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
बीड : परळी तालुक्यात झालेल्या जलयुक्त कामात गैरव्यवहार करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन बीड जिल्ह्यातील 138 मजूर सहकारी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकारी आणि मजूर कंत्राटदारांनी संगणमत करुन कृषी बोगस कामं दाखवून 2 कोटी 41 लाख 636 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कृषी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 138 मजूर सहकारी संस्थांमध्ये आष्टी/पाटोदा, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, धारुर तालुक्यातील मजूर सहकारी संस्थांचा समावेश आहे.
परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामं मंजूर झाली होती. त्यापैकी काही कामामध्ये गैरव्यवहार झाला तर काही कामं न करता पैसे उचलले, अशी तक्रार पुण्यातील कृषी आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर विशेष पथकाने परळी तालुक्यात येऊन तक्रारीची शहानिशा करुन पाहणी केली.
या पाहणीत कामं न करता बोगस बिलं उचलल्याचं निदर्शनास आलं. त्यावरुन यापूर्वी परळी आणि अंबाजोगाई कृषी कार्यालयाच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement