एक्स्प्लोर
वैद्यनाथ बँक निवडणूक, तिसऱ्या फेरीनंतरही पंकजा मुंडेंचं पॅनल आघाडीवर
बीडः राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना हाबाडा देत पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेवर झेंडा फडकवला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व 17 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.
विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पॅनलमधील उमेदवारांना फक्त 25 टक्के मतदान झालं आहे. तर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील पॅनलाला 75 टक्के मतदान झालं आहे.
आतापर्यंत चौथ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अजून दोन फेऱ्या बाकी आहेत. मात्र पंकजा मुंडेंच्या गटानं मोठ्या प्रमाणात आघाडी घेतल्यानं आता धनंजय मुंडेंच्या गटाचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत बीडच्या खासदार प्रितम मुंडेंना सर्वाधिक मत मिळाली आहेत. त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी बाजी मारत धनंजय मुंडेंना धूळ चारली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement