एक्स्प्लोर

बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी! अद्याप टँकरचा एकही प्रस्ताव नाही, मुबलक पाणीसाठा शिल्लक 

Beed News Update : बीड जिल्हावासियांसाठी यंदा आनंदाची बातमी आहे. कारण बीडमध्ये या वर्षी मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे अद्याप टँकरचा एकही प्रस्ताव प्रशासनाकडे आला नाही.  

Beed News Update : दरवर्षी उन्हाळा आला की बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात होते. एप्रिल-मे मध्ये तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. परंतु, या वर्षी बीड वासियांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा अद्यापपर्यंत बीड जिल्ह्यात टँकरचा एकही प्रस्ताव आलेला नाही. मागच्या वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली. याचाच परिणाम म्हणजे बीड जिल्ह्यात अद्याप कोठेही टँकरची मागणी झालेली नाही. 

उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी उपाय योजना करण्यात बीड जिल्हा प्रशासन व्यस्त असायचे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा आराखडा मांडला जायचा. मात्र,  मागच्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठा चांगल्या स्थितीत आहे.

दुष्काळी बीड जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासूनच पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागते. यंदा मात्र एप्रिलच्या मध्यापर्यंत टँकर मागणीसाठीचा एकही प्रस्ताव स्थानिक पातळीवरून जिल्हा प्रशासनाकडे आलेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी उद्भवलेला नाही.  

बीड जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून चर्चेत असतो. मागील दहा वर्षात दुष्काळी उपाययोजनांवर शासनाला या भागात अतिरिक्त पैसा खर्च करून गावोगावच्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर उपलब्ध करावे लागले. साधारण दोन ते तीन वर्षाआड बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात हीच स्थिती अनुभवावी लागते. कमी पर्जन्यमान, शेतीसाठी उपलब्ध नसलेले पाणी आणि या विवंचनेतून होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय ही तितकाच गंभीर आहे.  

यंदा मात्र, जिल्हा प्रशासनाला एप्रिल महिना मध्यावर आलेला असतानाही पाण्यासाठी एकही टँकर गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर पाठवावे लागलेला नाही. बीड जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिकच पाऊस झाला.  त्यामुळे गोदावरी आणि कृष्णा खोर्‍याअंतर्गतच्या 144 प्रकल्पांमध्ये मोठा पाणी साठा उपलब्ध झाला. आता उन्हाळा सुरू झाल्याने बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होत आहे. त्यामुळे पिण्यासाठीच्या पाण्याच्या उपशामुळे प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असला तरी तो समाधानकारक आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यात यंदा पिण्यासाठी गावोगावी टँकर सुरू करण्याची वेळ येणार नाही. 

जिल्ह्यात 52.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध

पावसामुळे बीड जिल्ह्यातील गोदावरी व कृष्णा खोर्‍याअंतर्गतच्या 144 प्रकल्पांमध्ये सध्या 52.53 टक्के उपलब्ध झाला आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पात 328 दलघमी (दशलक्ष घनमीटर) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच केज तालुक्यातील मांजरा या दुसर्‍या मोठ्या प्रकल्पातही सध्या 176.963 दलघमी पाणीसाठा आहे. या दोन प्रकल्पात मिळून 63.31 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील बीड व परळी विभागातील 16 मध्यम प्रकल्पात 51.37 टक्के तर 126 लघु प्रकल्पात 32.32 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सर्व 144 प्रकल्पांच्या एकूण पाणीसाठ्याची टक्केवारी सद्यस्थितीत 52.53 टक्के इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने तुर्तास तरी पाण्याची अडचण नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget