![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
राष्ट्रवादी म्हणजे आयत्या बिळातील नागोबा ; प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल
Beed News Update : राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचं काम करत असल्याची टीका, भाजप खासदार प्रीतम मुंडे ( Pritam Munde) यांनी केली आहे.
![राष्ट्रवादी म्हणजे आयत्या बिळातील नागोबा ; प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल Beed News Update bjp leader pritam munde criticism on ncp राष्ट्रवादी म्हणजे आयत्या बिळातील नागोबा ; प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/17/bc84bd6e2b6c9438bbd524f45de4ab99_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Beed News Update : "आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांच्या भूमिपूजनाचे नारळ कोणाला फोडायचे ते फोडू द्या. बीड जिल्ह्यात सध्या घर एक जण बांधतोय आणि त्या घराची वास्तुशांती दुसराच कोणीतरी करतोय. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादीच्या (NCP) लोकांनी करू नये, सध्या राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचं काम करत असल्याची टीका, भाजप खासदार प्रीतम मुंडे ( Pritam Munde) यांनी केली आहे.
खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते आज गेवराई तालुक्यातील 14 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीसह राज्य सरकारवर कडाडून टीका केली. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुंडे भगिनी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोपाचं राजकारण तापलं आहे. त्यातच प्रीतम मुंडे यांनी पुन्हा एकदा विकास कामाचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये, असे खडे बोल सुनावले आहेत. पंकजा मुंडे पालकमंत्री असताना ही सर्व कामे मंजूर झाली आहेत. त्यामुळे कोणी कितीही नारळ फोडू द्या, जनता हुशार आहे, असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे.
प्रीतम मुंडे यांनी यावेळी मंचावर न बसता खाली बसलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही समाचार घेतला. या कार्यक्रमात शासकीय अधिकारी मंचावर न बसता सभामंडपाच्या बाजूला बसले होते. त्यामुळे प्रीतम मुंडे यांनी अधिकार्यांवर स्थानिक प्रशासनाचा दबाव आहे का असा प्रश्न? उपस्थित केला.
प्रीतम मुंडे म्हणाल्या, "बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांची नार्को टेस्ट करा आणि त्यांना विचारा की, गेल्या आठ वर्षात प्रीतम मुंडे यांनी कुठल्या कंत्राटदारकडून कामाच्या बदल्यात काही पैसे घेतले आहेत का? मी कुणाचा चहादेखील घेतला नाही. मी प्रामाणिकपणाने तुमचं काम करण्याचा प्रयत्न करत असून तुमचे प्रश्न सरकार दरबारी मांडत आहे."
महत्वाच्या बातम्या
Pritam Munde: बीडची बदनामी तुमच्या नाकर्तेपणामुळेच, प्रितम यांचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर
Satej Patil : कोल्हापुरात भाजपचा विखारी प्रचार, पैसे वाटले, काश्मीर फाईल तिकिटं दिली, 61 आमदार तळ ठोकून, सतेज पाटलांचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)