मोठी बातमी! मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल; आतापर्यंत पाच एफआयआर
FIR On Manoj Jarange : विशेष म्हणजे मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
FIR On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण जरांगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी बीडमध्ये (Beed) मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
मंगळवारी मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान त्यांच्या याच दौऱ्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतांना देखील रॅली काढून जीसीबीने धोकादायक पद्धतीने फुल उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर आणि पेठ बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर
मनोज जरांगे पाटील हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्याठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत करण्यात आलं. तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
आतापर्यंत पाच गुन्हे दाखल...
मनोज जरांगे यांच्यावर मागील काही दिवसांपासून एकामागून एक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत जरांगे यांच्यावर पाच गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यात चार गुन्हे एकद्या बीड जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा शिरूर पोलीस ठाणे, दुसरा अमळनेर, तिसरा गुन्हा पेठ बीड पोलीस ठाणे आणि चौथा गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर, नांदेड जिल्ह्यात देखील एक गुन्हा जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
रात्री उशिरा सभा घेतल्याने गुन्हा दाखल...
मनोज जरांगे यांची रविवारी नांदेडमध्ये रात्री 11.30 वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यलयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांची सभा झाली. त्यानंतर भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा सभा घेतल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Manoj Jarange : मला कधीही अटक होण्याची शक्यता, अहवाल देखील तयार; मनोज जरांगेंचा दावा