एक्स्प्लोर

पुतण्याच्या गटाचे चार नगरसेवक काकांच्या गटात, बीडमधील राष्ट्रवादीचे चार नगरसेवक शिवसेनेत

बीडमधील काका-पुतण्यामधील संघर्ष आणखी वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटातील चार नगरसेवकांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात प्रवेश केला आहे.

बीड : काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षाची किनार असलेल्या बीड जिल्ह्यातील चार नगरसेवकांनी पुतण्याला रामराम ठोकून काकाचे नेतृत्व मान्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे चार नगरसेवक आता जयदत्त क्षीरसागर गटामध्ये सामील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा एक नगरसेवक शिवसेनेमध्ये गेला होता आता चार नगरसेवक राष्ट्रवादीला सोडून गेल्याने पुतण्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एक वर्षांपूर्वी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर संदीप क्षीरसागर आमदार झाले. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी संदीप शिरसागर यांच्या मागे मोठं बळ उभं केलं. आता संदीप क्षीरसागर यांच्याकडून डावलले जात असल्याची भावना या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यानंतर आज (30 जानेवारी) नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे आणि भैयासाहेब मोरे यांनी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील चार नगरसेवक हे शिवसेनेमध्ये डेरेदाखल झाल्याने महाविकास आघाडीतील धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नाना विकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले संदीप क्षीरसागर गटाचे 20 नगरसेवक होते, त्यापैकी आतापर्यंत आठ नगरसेवकांनी संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाला सोडचिठ्ठी दिली आहे.

रक्ताची नाती तोडणाऱ्यांनी जनतेचे भले केलेले कधी कुणी पाहिले आहे का? : भरतभूषण क्षीरसागर चार नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यानंतर यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, "राजकारणात काम करत असताना आपल्या परंपरेत राहूनच काम करावे लागते. घरात मोठ्यांचा सन्मान ठेवणे ही संस्कृती आहे. पदासाठी रक्ताची नाती तोडणाऱ्यांनी जनतेचे भले केलेले कधी कुणी पाहिले आहे का? असा सवाल करत 35 वर्षापासून मी नगराध्यक्ष आहे. मलाही आमदारकीसाठी अडून बसता आले असते, पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या मोठ्यांचा मान राखायला हवा. स्वकर्तृत्वाने राजकारणात यश मिळवावे लागते. ज्यांच्या बोटाला धरुन आपण मोठे होतो त्यांच्याशी बेईमानी करुन जनाधार मिळत नसतो. अण्णासारखे शांत संयमी आणि कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे नेतृत्व असल्याने मला पदाचा कधीही मोह पडला नाही. जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली. ज्यांनी आज प्रवेश केला आहे त्यांना आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मानाची वागणूक देऊ."

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget