एक्स्प्लोर
धुळवडला जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची प्रथा
साडे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 150 घरजावई कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. धुळवडीच्या दोन दिवस आगोदार जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जाते.
बीड : बीड जिल्ह्यातील विडा या गावात जावयाच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून गाढवावरून गावभर धिंड काढून धुळवड साजरी केली जाते. मागील अनेक वर्षांपासून विडा या गावात ही प्रथा आहे. ही प्रथा पाहण्यासाठी शेजारील गावचे लोक या गावात धुलीवंदन दिवशी गर्दी करतात.
साडे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात 150 घरजावई कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत. धुळवडीच्या दोन दिवस आगोदार जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जाते.
धुळवडीच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसविण्याची तयारी करण्यात येते. यंदा मात्र अनेक तरूण जावयांनी पोबारा केल्यानं गावातील ज्येष्ठ जावई सावळराम पवार यांची गाढवावर बसण्याकरीता वर्णी लागली. या वर्षी सुद्धा जावयाची मिरवणूक संपू्र्ण गावातून वाजत गाजत काढण्यात आली.
गावातील मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्यांचा आहेर चढविण्यात आला. विशेष म्हणजे गाढवावर बसविण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसविण्यात येत नाही. ज्या जावयाला गाढवावर बसायचा मान मिळतो तो जावईसुध्दा मोठ्या उत्साहात गाढावावर बसतो, हे विशेषच.
थट्टा मसकरीत सुरु झालेली ही प्रथा आता या गावची संस्कृती बनली आहे. तशी या गावात घर जावयांची संख्या मोठी आहे. साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात दिडशेपेक्षा जास्त घरजावई आहेत. मात्र हेच घरजावई धुळवड आली की गाव सोडून जातात. शेवटी काहीही झाले तरी गावकरी मात्र कोणात्या न कोणत्या जावयाला पडकून अखेर गाढवावर बसवतातच.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement