एक्स्प्लोर
बीडमध्ये पेट्रोल पंपावरुन सात लाखांच्या डिझेलची चोरी
बीडमध्ये चोरट्यांनी चक्क नऊ हजार लिटर डिझेलची चोरी केली.
बीड : एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. त्यातच बीडमध्ये चोरट्यांनी चक्क नऊ हजार लिटर डिझेलची चोरी केली. विशेष म्हणजे पेट्रोल पंपाचे उद्घाटन अद्याप झालेलं नाही. अंडरग्राउंड टँकला मोटार लावून चोरट्यांनी सात लाख रुपयांचं डिझेल लुटलं.
बीडमधील माजलगाव-परभणी रोडवर पवारवाडीमध्ये किशोर उनवणे यांचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाचं उद्घाटन दसऱ्याला करायचं नियोजित होतं. गेल्या वर्षभरापासून या पेट्रोल पंपाच्या उभारणीचं काम सुरु होतं. आता मात्र या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाचा मुहूर्त दिवाळीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला. याचं कारण म्हणजे या टँकमधून चक्क नऊ हजार लिटर डिझेल चोरीला गेलं आहे.
पेट्रोल पंपाचा परवाना मिळाला की कंपनी टेस्टिंगसाठी बारा हजार लिटर डिझेल पंप चालकाला देते. त्यामुळे पंप चालकाने मार्चपूर्वी बारा हजार लिटर डिझेल या टॅंकमध्ये ठेवलं होतं. गेल्या सहा महिन्यांपासून हे डिझेल टॅंकमध्ये सुरक्षित होतं. मात्र अचानक रात्री चोरट्यांनी मोठ्या शिताफीने डिझेल चोरलं. यासाठी चक्क मोटारीचा वापर करण्यात आला.
चोरट्यांनी इतक्या शिताफीने डाव साधला, की पेट्रोल पंपाच्या रक्षणासाठी असलेल्या निद्रिस्त सुरक्षारक्षकांना समजलंही नाही. नऊ हजार लिटर डिझेल चोरुन न्यायचं, ही छोटी गोष्ट नाही. तब्बल अडीच ते तीन तासापर्यंत चार ते पाच माणसं या पेट्रोल पंपाच्या बाजूला बसवून डिझेल भरत होती. डिझेल घेऊन चोर पसार झाल्यावर सकाळी ही घटना पंप चालकाच्या लक्षात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement