एक्स्प्लोर
ढिसाळ नियोजनामुळे अवनी वाघिणीची शिकार, 'एनटीसीए'च्या अहवालात ठपका
नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने अवनी वाघिणीच्या शिकारीबाबतचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार हलगर्जीपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे अवनी वाघिणीची शिकार करावी लागली.
नागपूर : नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने अवनी वाघिणीच्या शिकारीबाबतचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार हलगर्जीपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे अवनी वाघिणीची शिकार करावी लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार अवनी या टी वन वाघिणीला ठार केले त्या दिवशी यवतमाळच्या जंगलात वाघिणीला पकडण्यासाठी आलेल्या टीमने व्हेटरनरी टीमसोबत नीट समन्यव राखला नव्हता, असे निष्पन्न झाले आहे.
अवनीला बेशुद्ध करण्यासाठी डॉ. कडू यांनी दिलेला डार्ट (बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन) 24 तासांच्या आत वापरणे बंधनकारक होते. परंतु मुखबीर शेख यांनी तो डार्ट तब्बल 56 तासांनी वापरला. त्यामुळे अवनी बेशुद्ध झाली नाही. परिणामी अवनीला ठार मारावे लागले. असा अहवाल नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथोरिटीने (एनटीसीए) दिला आहे.
अवनी या टी1 वाघिणीला ठार केल्यानंतर एनटीसीएने याबाबत अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, व्हेटरनरी टीम आणि अवनीला जेरबंद करण्यासाठी गेलेली टीम यांच्यात समन्वय नव्हता. अवनीला बेशुद्ध करण्यासाठी दिलेला डार्ट तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरला गेला. प्रामुख्याने दोन दिवस उशीराने डार्ट वापरल्यामुळे अवनी बेशुद्ध झाली आहे.
अवनीची शिकार केली त्या दिवशी तिला मारण्यापूर्वी ती अनेकदा दिसली होती. त्यामुळे अवनीला पकडण्यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते. परंतु कोणतेही नियोजन न करता अवनीवर हल्ला करण्यात आला. अवनीला ठार केले त्या टीममध्ये व्हेटरनरी डॉक्टर, बायोलॉजिस्ट असे कुणीही नव्हते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement