एक्स्प्लोर
एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल : पाटील
सलग चार वर्षांमधील युतीबाबतच्या माझ्या पत्रकार परिषदा पाहिल्या तर कधीही एका वाक्याने सुद्धा युतीबाबत साशंक नाही
सिंधुदुर्ग : एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल, अशी ऑफर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. युतीबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील आज (08 सप्टेंबर) सिंधुदुर्गात बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल. शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, खोत, शेट्टी या सगळ्याचा समतोल करत कसं पुढे जायचं हे लक्षात येईल. पण यशस्वीपणे समतोल साधत आम्ही चार वर्ष पूर्ण केली. एक वर्षही पूर्ण होईल. पुन्हा निवडणूक जिंकू, पुन्हा शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर सदाभाऊ खोत, परत आले तर शेट्टीसाहेब सगळे एकत्र येऊ."
युतीबाबत साशंक नाही
"सलग चार वर्षांमधील युतीबाबतच्या माझ्या पत्रकार परिषदा पाहिल्या तर कधीही एका वाक्याने सुद्धा युतीबाबत साशंक नाही. मी नेहमीच म्हणतो युती होईल. हे चार वेळा वेगवेगळ्या घटनांमध्ये पाहिलं आहे. त्यापैकी एक म्हणजे राज्यसभेच्या उपसभपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मतदान केलं होतं," असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल : चंद्रकांत पाटील https://t.co/CPo4I626F9 pic.twitter.com/rcAf5gQrkP
— ABP माझा (@abpmajhatv) September 8, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement