एक्स्प्लोर
28 वर्ष रखडलेल्या बार्शी उपसा सिंचन योजनेला सुधारित मान्यता; पाहणीच्या निमित्तानं राष्ट्रवादी अन् भाजप पुरस्कृत आमदार एकत्र
कित्येक वर्षांपासून रखडलेल्या बार्शी उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. यावेळी भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Solapur Barshi News: मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या बार्शी उपसा सिंचन योजनेला (Barshi Sinchan Yojana) सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यावेळी भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे (BabanDada Shinde) एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या प्रकल्पामुळे बार्शी आणि माढा तालुक्यातील जवळपास 15 हजार हेक्टर शेतीला फायदा होणार आहे.
26 जुलै रोजी जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव विलास राजपूत आणि आमदार राजेंद्र राऊत यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण योजनेची माहिती घेऊन, रखडलेली योजना पूर्ण करण्यासाठी येत्या 2 ते 3 महिन्यात निवीदा प्रसिद्ध करून 2 ते 3 वर्षांत योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याच योजनेच्या निमित्ताने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आणि आमदारांनी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे भेट देऊन कामाची पाहणी केली.
यावेळी भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार बबनदादा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. या भेटीवेळीही राजेंद्र राऊत आणि बबनदादा शिंदे हे एकत्र होते. त्यानंतर पुन्हा एकदा विकासकामांच्या निमित्ताने बबनदादांची भाजप पुरस्कृत अपक्ष आमदारांशी जवळीक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस आम्हाला सहकार्य करतात -राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे
"कोणताही विकास करायचा असेल तर सत्ताधाऱ्यांच्या भेटीसाठी घ्याव्या लागतात. देवेंद्र फडणवीस आम्हाला सहकार्य करतात. ते मुख्यमंत्री असताना देखील पाच वर्ष त्यांनी आम्हाला सहकार्य केलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत." अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी दिले.
बबनदादा शिंदे आणि राजन पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण
तसेच दिल्लीत बबनदादा शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना 'मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्ताने गेलो होतो. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील महाराष्ट्र सदनात होते. त्यामुळे त्यांची भेट घेतली होती. ईडीचा दम दाखवून पक्षात घेणं असा कोणताही प्रकार माझ्या बाबतीत झालेला नाही.' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
जवळपास 15 हजार हेक्टर शेतीला फायदा
"बार्शी उपसा सिंचन या 28 वर्ष प्रखडलेले योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 28 दिवसात 28 वर्ष रखडलेला प्रकल्पाला चालना दिली आहे. या प्रकल्पामुळे बार्शी आणि माढा तालुक्यातील जवळपास 15 हजार हेक्टर शेतीला फायदा होणार आहे. 28 वर्ष रखडलेला प्रकल्प याची पाहणी आम्ही अधिकाऱ्यांसोबत केली आहे. लवकरच ही योजना पूर्णत्वास येईल असा विश्वास आहे." अशी प्रतिक्रिया बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement