एक्स्प्लोर
Advertisement
तरुणीच्या पालकांची मारहाण, बारामतीत तरुणाची आत्महत्या
बारामती (पुणे) : आमच्या मुलीला फोन का केला, याचा जाब विचारत तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीमुळे तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. बारामतीतील जळगाव कडेपठारमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे.
आमच्या मुलीला फोन का केला, असा जाब विचारत संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी संतोष रसाळ नावाच्या तरुणाचं घर गाठलं. मात्र तो घरी नसल्यामुळे त्याला आपल्या घरी बोलावून तिच्या पालकांनी बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर तरुणाच्या आई-वडिलांना आपल्या घरी बोलावून मुलाला घेऊन जाण्यास सांगितलं.
या घडलेल्या प्रकारामुळेच संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप संतोषच्या वडिलांनी केला आहे. बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार मध्ये ही घटना घडली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रीडा
निवडणूक
Advertisement