एक्स्प्लोर
24, 25, 31 डिसेंबरला बार आणि पब्स पहाटेपर्यंत खुले
वर्षअखेरीस प्रत्येकाला जल्लोष करायचा असतो, त्यामुळे गृह खात्यातर्फे ही मुदतवाढ देण्यात आली आहे
![24, 25, 31 डिसेंबरला बार आणि पब्स पहाटेपर्यंत खुले Bar, Pubs can stay open till 5am on December 24, 25 and 31st latest update 24, 25, 31 डिसेंबरला बार आणि पब्स पहाटेपर्यंत खुले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/15171622/beer-compressed-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर वाईन शॉप रात्री 1 पर्यंत खुले राहणार आहेत.
गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.
इतर वेळी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, बार आणि पब्स 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तर रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाईन शॉप्सना एक वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
वर्षअखेरीस प्रत्येकाला जल्लोष करायचा असतो, त्यामुळे आम्ही ही मुदतवाढ दिली आहे. यामुळे मुंबईला एक पर्यटनस्थळ म्हणूनही चालना मिळते. या दिवशी पोलिसांना अतिरिक्त कुमक ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
वेळेत वाढ करण्यात आली असली, तरी बार आणि पब चालकांना अद्याप पोलिसांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. पोलिस महासंचालकांना यासंदर्भात पत्र दिल्याची माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या अध्यक्षांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)