एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-पुण्यानंतर आता परभणीत निवडणूक बॅनरबाजी, शहरातील 500 ऑटोंवर '30 साल, परभणी बेहाल'चे बॅनर
परभणी विधानसभा मतदार संघावर 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असल्याने हे प्रश्न शिवसेनेलाच विचारण्यात आले असल्याचा अंदाज आहे. मात्र हि बॅनरबाजी कुणी केली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
परभणी : विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना आता राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुंबई-पुण्याप्रमाणे परभणीतही निवडणुकीपूर्वी जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे. शहरातील तब्बल 500 पेक्षा जास्त ऑटोरिक्षांवर '30 साल, परभणी बेहाल', 'हिशेब मागतेय परभणी' या मथळ्याखाली बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची सध्या शहरात जोरदार चर्चा आहे. गेल्या 30 वर्षांपासून परभणी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची सत्ता असल्याने विरोधी पक्षातील नेमकं कोण या सगळ्यामागे असावं याचे अंदाज बांधले जात आहेत.
परभणी शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक तसेच इतर ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांवर परभणीच्या विकासाबाबत वेगवेगळे प्रश्न 'स्लोगन' मार्फत विचारण्यात आले आहेत. आज पहाटे पासूनच या ऑटोरिक्षा शहरभर फिरत आहेत. '30 साल, परभणी बेहाल', 'हिशेब मागतेय परभणी' या मथळ्याखाली हे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे रिक्षाचालक या बॅनरबाबत काहीही माहिती देण्यास तयार नाहीत. हे बॅनर कुणी लावले आहेत? या प्रश्नाची उत्तरं देण्यास ते टाळाटाळ करत असून सकाळी प्रत्येक ऑटोरिक्षा चालकाला 100 रुपये देऊन हे बॅनर लावले असल्याची माहिती काही ऑटोरिक्षा चालकांनी दिली आहे. शहरातील वसमत रस्ता असो कि जिंतूर रस्ता सगळ्याच रस्त्यांवर हे ऑटो दिवसरात्र फिरत असतात. त्यामुळे शहरभर या ऑटोरिक्षावर लावलेली स्लोगन आणि प्रश्न वाचले जात असल्याने आज हा विषय चर्चेचा बनला आहे.
परभणी विधानसभा मतदार संघावर 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असल्याने हे प्रश्न शिवसेनेलाच विचारण्यात आले असल्याचा अंदाज आहे. मात्र हि बॅनरबाजी कुणी केली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement