एक्स्प्लोर

2015 साली संभाजी निलंगेकरांकडून बँकांनीच 41 कोटी रुपये नाकारले!

संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या मद्यार्क निर्मिती कारखान्यासाठी महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकेकडून कर्ज घेतले होते. या बँकांनी निलंगेकरांवर मेहरबान होत कर्जाच्या व्याज आणि मुद्दलातले 51 कोटी 40 लाख रुपये माफ केले आहेत.

उस्मानाबाद : राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या कर्जाबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संभाजी निलंगेकरांनी 2015 साली बँकेला 41 कोटी रुपये देऊ केले होते. मात्र बँकांनी घेण्यास नकार दिला आणि आता 76 कोटींचं कर्ज अवघ्या 25 कोटीत सेटलमेंट केली. संभाजी निलंगेकरांवर महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक का मेहेरबान असा प्रश्न एबीपी माझाने विचारला होता. एबीपी माझाने यासंदर्भातील बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनीही निलंगेकरांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. निलंगेकर बँकेचे जावई आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर शेतकऱ्यांना कधी मदत मिळत नाही मात्र निलंगेकरांना कसे 51 कोटी माफ होतात, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी  दिली. काय आहे प्रकरण? संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या मद्यार्क निर्मिती कारखान्यासाठी महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकेकडून कर्ज घेतले होते. या बँकांनी निलंगेकरांवर मेहरबान होत कर्जाच्या व्याज आणि मुद्दलातले 51 कोटी 40 लाख रुपये माफ केले आहेत. व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीला महाराष्ट्र बँक आणि युनियन बँकेने 2009 मध्ये प्रत्येकी 20 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलं. दोन वर्ष या कर्जाच्या व्याजाची रक्कम निलंगेकर जामीनदार असलेल्या कंपनीने नियमित परत केली. पण 2011 पासून कंपनीनं व्याज आणि मुद्दलाचे पैसे भरणे बंद केले. खाते एनपीएमध्ये गेले. दरम्यानच्या काळात संभाजी पाटलांनी आपल्या आजोबांचीच जमीन त्यांना माहिती न देता बँकेकडे गहाण ठेवली. हा प्रकार उघडकीस आल्यावर बँकेनं सीबीआयकडे फसवणुकीची तक्रार केली. सीबीआयने संभाजी पाटील आणि कंपनीची चौकशी करुन 3 हजार 27 पानांचे आरोपपत्र लातूरच्या न्यायालयात दाखल केले. त्यावर अजून सुनावणी झालेली नाही. मात्र अशावेळी महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक उदार झाली. त्यांनी मुद्दल कमी करुन आणि व्याजात माफी देऊन वन टाईम सेटलमेंट केली. ज्यानुसार 31 मार्चपर्यंत 12 कोटी 75 लाख भरुन संपूर्ण बेबाकी देण्याची तयारी दाखवली. अशी सूट देताना सीबीआयच्या प्रकरणात कोणतीही मदत होणार नाही, अशी अट घातली आहे. मात्र याचा सीबीआयच्या तावडीतून सुटण्यासाठी मदत होईल हे निश्चित. कुठल्या-कुठल्या बँकेनं किती सूट दिली? महाराष्ट्र बँकेचं एकूण येणं 20 कोटी 9 हजार रुपये आहे. त्यावरचं व्याज 21 कोटी 75 हजार रुपये आहे. म्हणजे निलंगेकरांकडून एकूण 39 कोटी 86 लाख रुपये येणं बाकी आहे. तर मेहरबान बँकेनं संपूर्ण व्याज माफ केलं. शिवाय मुद्दलात 8 कोटीची सूट दिली. म्हणजे आता फक्त 12 कोटी 75 लाखाचीच परतफेड करायची आहे. युनियन बँकेचं खातं 30 जुलै 2011 ला एनपीए झालं. युनियन बँकेचं मुद्दल 20 कोटी 51 लाख आहे. त्यावर व्याज 16 कोटी 40 लाख रुपये आहे. एकूण वसुली 37 कोटी 4 लाख आहे. इथंही बँकेनं सगळं व्याज माफ केलं. मुद्दलात 8 कोटीची सूट दिली. त्यामुळे आता 37 कोटी 4 लाखापैकी 12 कोटी 75 लाख एवढीच रक्कम भरायची आहे. म्हणजे संभाजी पाटलांना दोन्ही बँकांचे मिळून 76 कोटी 90 लाख एवढं देणं होतं. त्यापैकी 25 कोटी 50 लाख रुपयांना दोन्ही खाती सेटल झाली. बँकांना मात्र एकूण 51 कोटी 40 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. संबंधित बातमी : संभाजी निलंगेकरांचं 76 कोटींचं कर्ज 25 कोटीत सेटल

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget