एक्स्प्लोर
Advertisement
बालेवाडी स्लॅब दुर्घटना : अखेर कंत्राटदाराला बेड्या
पुणे: पुण्यातील बालेवाडी स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अखेर मुख्य कंत्राटदार महेंद्र कामतला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र इतर 6 आरोपी अद्यापही फरार आहेत.चतुःश्रुंगी पोलिसांनी कामतवर कारवाई केली.
बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळला
पुण्यातील बालेवाडी परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौदावा मजल्याचा स्लॅब कोसळल्याने नऊ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. 29 जुलैला ही दुर्घटना घडली होती.
बालेवाडीच्या किर्लोस्कर कमिन्स ऑफिससमोरील या इमारतीचं काम सुरु होतं. मात्र त्याचवेळी चौदाव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी दोन प्रोजेक्ट इनचार्ज आणि दोन आर्किटेक्ट्सना अटक केली होती. पण बिल्डर फरार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात होतं. बिल्डरपर्यंत पोलीस पोहोचत नव्हते. मात्र अखेर आज कामतला अटक झाली आहे.
संबंधित बातम्या
पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, 9 जणांचा मृत्यू
पुण्यातील स्लॅब दुर्घटनेप्रकरणी चार जण अटकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement