Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन, अभिवादनासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतीदिन. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.
LIVE
Background
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. आज बाळासाहेबांचा 11 वा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली..तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..तर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरुन बाहेर जाण्याची विनंती केली.. मात्र शिवतीर्थावरुन बाहेर येताच दोन्ही गटात पुन्हा जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
Supriya Sule: सु्प्रिया सुळे यांनी फोटो शेअर करत केले बाळासाहेबांना अभिवादन
Supriya Sule: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेंबाच्या भेटीचा फोटो शेअर करत अभिवादन केले आहे.
Narayan Rane: साहेबांवर माझं प्रेम आणि निष्ठा होती : नारायण राणे
Narayan Rane: साहेब या जगातून निघून गेल्याला आज 11 वर्षे पूर्ण झाली. साहेब नाहीत यावर आज सुध्दा विश्वास बसत नाही. साहेबांवर माझं प्रेम आणि निष्ठा होती. शेवटी ते माझे गुरु होते, पितृतुल्य होते, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
असे प्रेम आणि विश्वास पुन्हा मिळेल काय?
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 17, 2023
असे साहेब पुन्हा होणे नाही!
साहेब या जगातून निघून गेल्याला आज 11 वर्षे पूर्ण झाली. साहेब नाहीत यावर आज सुध्दा विश्वास बसत नाही. ‘‘झंझावात’’ या माझ्या आत्मचरित्रातील साहेबांची एक आठवण आजच्या दिवशी सगळ्यांनी वाचावी ही नम्र विनंती.… pic.twitter.com/rGVeSPr2xe
Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवतीर्थावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवतीर्थावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कालच्या प्रकारे नियोजन केलं होतं त्यात बदल करून अतिरिक्त सुरक्षा या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. सर्व शिवसैनिक शांततेत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतील त्यानुसार आम्ही नियोजन केला आहे आणि तशा प्रकारच्या सूचना वेळोवेळी देत आहोत, अशी माहिती डीसीपी झोन 5 चे मनोज पाटील यांनी दिली आहे