एक्स्प्लोर
हवेत तलवारी फिरवून नागपुरात बजरंग दलाची सशस्त्र शोभायात्रा
![हवेत तलवारी फिरवून नागपुरात बजरंग दलाची सशस्त्र शोभायात्रा Bajarang Dal Shobhayatra With Swords And Other Weapons हवेत तलवारी फिरवून नागपुरात बजरंग दलाची सशस्त्र शोभायात्रा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25073812/nag-shashatra-shobha-3-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपुरात बजरंग दलाने पुन्हा एकदा सर्व कायदे धाब्यावर बसवून सशस्त्र शोभायात्रा काढण्याचा प्रयत्न केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी हवेत शस्त्र फिरवून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी विश्व हिंदू परिषदेतर्फे शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी घेऊन भरपूर नारेबाजी केली. इतकंच नाही तर काही जणांच्या हाती परशूसुद्धा होते.
शस्त्र हवेत फिरवणे आणि त्यांचे अशाप्रकारे प्रदर्शन करणे बेकायदेशीर असल्याचं पोलिसांनी कार्यकर्त्यांना सांगितलं, तेव्हा हा प्रकार थांबला. गेल्या वर्षीही अशाच शस्त्र प्रदर्शनासाठी बजरंग दलाला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. मात्र यंदाही त्याची पुनरावृत्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)