Babanrao Taywade: मनोज जरांगेंच्या मनात काय सुरु आहे हे त्यांनाच ठाऊक; बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया
जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे. मात्र तसे न होता त्यांनी पुन्हा आंदोलन करणे, हे आमच्या कळण्याच्या पलीकडे असल्याचे मत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.
Nagpur News नागपूर : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची (Maratha Reservation GR) अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे. मात्र सरकारने 17 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागवले आहेत. कायद्यानुसार ही एक प्रक्रिया असून 17 तारखेपर्यंत जे काही आक्षेप असतील, ते या दरम्यान नोंदवण्यात येतील. त्यानंतर या सुधारित मसुद्यावर विशेष अधिवेशन बोलवून त्याचे कायद्यात रूपांतर केल्या जाऊ शकतं. जो वेळ या प्रक्रियेला लागतो, तितका वेळ जरांगे पाटील यांनी सरकारला दिला पाहिजे. मात्र तसे न होता त्यांनी पुन्हा उपोषण करत आंदोलन करणे, हे आमच्या कळण्याच्या पलीकडे असल्याचे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.
एकीकडे गुलाल उधळला, मात्र आजपासून पुन्हा उपोषणा
26 जानेवारीला मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये फार मोठे आंदोलन उभे केले. त्यानंतर त्यांच्या लढ्याला यश आले म्हणून त्यांनी मोठा जल्लोष केला. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाला, हे जाहीर केलं, गुलाल उधळला. मात्र आजपासून ते पुन्हा उपोषणाला बसत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी प्रामुख्याने एक मागणी केल्याचे कळते आहे की, सरकारने लवकरात लवकर जो काही प्रस्तावित मसुदा राजपत्रिकेत जाहीर केला आहे, त्याचे कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात यावे. जेव्हा की सरकारने 17 फेब्रुवारी पर्यंत आक्षेप मागवले आहेत. कायद्यानुसार ही एक प्रक्रिया असून 17 तारखेपर्यंत जे काही आक्षेप असतील, ते या दरम्यान नोंदवण्यात येतील. त्यानंतर सरकारला त्याचे निराकरण करावे लागेल आणि नंतर त्या मसुद्यामध्ये नव्याने काय गोष्टी नमूद करायच्या किंवा काय काढायच्या यावर विचार केला जाईल.
ही सर्व प्रक्रिया झाली की हा संपूर्ण सुधारित मसुदा मंत्रिमंडळामध्ये पारित होईल आणि मग मंत्रिमंडळामध्ये पारित झालेल्या या मसुद्यावर विशेष अधिवेशन बोलवून त्याचे कायद्यात रूपांतर केल्या जाऊ शकतं. अशी ही एकंदरीत प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला वेळ लागतो, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. हे ठाऊक असताना देखील वारंवार आंदोलन करून हेच करा आणि असेच करा, असे बोलण्यात काहीही अर्थ नसल्याचे देखील बबनराव तायवाडे म्हणाले.
55 हजार प्रमाणपत्र एकट्या विदर्भातील
ज्या प्रक्रियेला जेवढा वेळ लागणार आहे, तेवढा वेळ दिलाच पाहिजे. म्हणून आज पासून सुरु होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामागे त्यांचा आणखी कुठला हेतू आहे हे त्यांनाच ठाऊक. हे आम्हाला तरी अद्याप कळलेले नसल्याचे देखील बबनराव तायवाडे म्हणाले. काल बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी जो 57 लाख मराठा नोंदी सापडल्या असल्याचा आकडा देत दावा केला, त्यापैकी 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले, अनेक लोकांना फायदा झाला असे त्यांनी सांगितले. त्यांना मी सांगू इच्छितो की हे 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित झाले ते 1967 ते 2023 या कालावधीमध्ये झाले आहे.
आंदोलनानंतर काय हा आकडा त्यांनी सांगावा. मी जाहीरपणे सांगतो, आंदोलन सुरू झाल्यानंतर 24 ऑक्टोंबर 2023 ते आजपर्यंत या महाराष्ट्रात दीड लाख नोंदी प्रमाणे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या दीड लाख प्रमाणपत्रापैकी 55 हजार प्रमाणपत्र एकट्या आमच्या विदर्भातील 11 जिल्ह्यातील आहे. ही नियमित चालणारी प्रक्रिया असून त्यातून मिळालेले हे प्रमाणपत्र आहे. सोबतच ज्या मराठवाड्यामध्ये हे आंदोलन सुरू होते त्याच मराठवाड्यात केवळ 20 हजार नवीन प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे देखील बबनराव तायवाडे म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल थांबवा
मनोज जरांगे पाटील कधी 37 लाख, कधी 57 लाखाचा आकडा सांगून जे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहे, हे सरकारने थांबवायला पाहिजे आणि सत्य परिस्थिती लोकांपुढे आणली पाहिजे. आज संपूर्ण ओबीसी समाज या आंदोलनामुळे भयभीत झाला आहे. इतक्या मोठ्या संख्येने नवीन लोक ओबीसीमध्ये आले आणि त्याच्यामुळे आतापर्यंत आमच्या ओबीसी समाजाला मिळत असलेला हिस्सा आहे, तो भविष्यामध्ये मिळणार की नाही, अशा पद्धतीची संभ्रम ओबीसी मध्ये निर्माण होत आहे. हा संभ्रम सरकारने कुठेतरी थांबविला पाहिजे. असे देखील बबनराव तायवाडे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण; म्हणाले आता माघार नाहीच