बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण! 26 पैकी 8 आरोपींना पोलीस कोठडी, उर्वरित आरोपींची कारागृहात रवानगी
Baba Siddiqui murder case : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी (Baba Siddiqui murder case) अटक करण्यात आलेल्या एकूण 26 आरोपींना आज मकोका न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Baba Siddiqui murder case : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी (Baba Siddiqui murder case) अटक करण्यात आलेल्या एकूण 26 आरोपींना आज मकोका न्यायालयात हजर करण्यात आले होते. या 26 पैकी 8 आरोपींना न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर उर्वरित आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अनमोल बिश्नोईचे नाव समोर
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अनमोल बिश्नोईचे नाव समोर आल्यानंतर आरोपींविरुद्ध मकोकाची गंभीर कलमे लावण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात आत्तापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील 8 आरोपींना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
12 ऑक्टोबर 2024 ला झाली होती बाबा सिद्दीकी यांची हत्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकींच्या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली होती. अशातच फरार असलेला आरोपी शिवकुमार देखील आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही मुंबईत बाबा सिद्दिकीची रेखी करत होतो आणि 12 ऑक्टोबरला रात्री योग्य वेळ मिळताच आम्ही बाबा सिद्दिकीची हत्या केल्याची माहिती आरोपींना दिली आहे. त्यादिवशी सण असल्याने तिथे पोलिस आणि गर्दी होती, त्यामुळे दोन जण जागीच पकडले गेले आणि मी पळून गेल्याची माहिती आरोपीनं दिली आहे. दरम्यान, घटनेनंतर लगेच पोलीसांनी दोन आरोपांनी अटक केली होती. तो आरोपी फरार झाला होता. शिवकुमार असं फरार आरोपीचं नाव होते. हा बाबा सिद्दीकी यांची हत्या प्रकरणातील मुख्य शूटर आहे. तो थेट लॉरेन्स गँग सिंडिकेटच्या संपर्कात होता. लॉरेन्स गँगच्या सर्व सूचना त्याच्या मोबाईलवर येत होत्या. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरला जाणार होते. तिथे त्याला लॉरेन्स गँगच्या एका गुंडाला भेटायचे होते. हत्येनंतर मुंबई पोलीस तत्काळ शिवकुमारच्या शोधात ओंकारेश्वर येथे आले, मात्र तो तेथे सापडला नाही. अकेर त्यांला उत्तर प्रदेशातूव अटक करण्यात आली होती. तो आरोपी नेपाळला जाण्याच्या तयारी होता.
महत्वाच्या बातम्या: