एक्स्प्लोर
'अवनी' वाघीण मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्राची समिती दाखल
अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्राची समिती यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण समिती दिल्लीचे चार सदस्य असलेले चौकशी पथक जिल्ह्यात आले आहे.
यवतमाळ : टी 1 म्हणजे 'अवनी' वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात तिच्या मृत्यूप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आता अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्राची समिती यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण समिती दिल्लीचे चार सदस्य असलेले चौकशी पथक जिल्ह्यात आले आहे.
हे चौकशी पथक दोन दिवस या वाघीण मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार आहे. आज ज्या ठिकाणी टी 1 वाघिणीला ठार मारले त्या ठिकाणी समितीने भेट दिली. बोराटी-राळेगाव मार्गावरील तिसऱ्या नाल्याजवळ या वाघिणीला ठार मारले होते. 'अवनी'ला ठार मारणाऱ्या वन विभागाच्या पथकातील सर्व सदस्यांची समिती चौकशी करीत आहे. ही समिती सखोल चौकशी करीत असून त्याच्या अहवाल सरकारला सादर करणार आहे. आज दुपारी 12.30 पासून सुरू झालेली चौकशी सायंकाळी 5.30 पर्यंत सुरू होती.
चौकशीसाठी राज्य सरकारने देखील समिती स्थापन केली
टी 1 वाघीण मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने देखील समिती स्थापन केली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. सदर समिती टी 1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.
वन विभागाने अवनीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न केल्यानंतर तिने वन विभागाच्या बचाव पथकावर हल्ला केल्यामुळे तिला गोळ्या घातल्याचं सांगितलं जात होतं. एका कथित ऑडिओ क्लिपिमध्ये मात्र वाघिणीला थेट गोळ्या घातल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले 'ऑपरेशन टी वन' आणखी वादात सापडतं की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी जर हिंसक बनत असेल तर त्याला बेशुद्ध करुन पकडणं, असा नियम आहे. मात्र अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आलं, असा आरोप केला जात आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























