एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पावसाअभावी मराठवाडा कोरडाठाक, नागरिकांची शहराकडे धाव
![पावसाअभावी मराठवाडा कोरडाठाक, नागरिकांची शहराकडे धाव Aurangabad Water Shortage In Marathwada Due To Lack Of Rain People Running Towards Cities Latest Udate पावसाअभावी मराठवाडा कोरडाठाक, नागरिकांची शहराकडे धाव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/17180544/Marathwada-Aurangabad-Drought.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्याची वाटचाल पुन्हा एकदा दुष्काळवाड्याच्या दिशेनं सुरु झाली. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातून एक हजाराहून अधिक कुटुंबांनी रोजी-रोटीच्या शोधात महानगरांकडे स्थलांतर केलं आहे. मराठवाड्यात सलग चाळीस दिवस पावसाचा थेंबही पडलेला नाही.
पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांचे हे हाल असतील तर मोल-मजुरी आणि रोजंदारीवर जगणाऱ्यांची काय व्यस्था असेल याचा विचार न केलेला बरा.. औरंगाबादपासून 30 किलोमीटरवर असलेलं आडूळ खूर्द गाव. इथं दोनशेहून अधिक बिऱ्हाडं राहतात. त्यांची उपजीविका फक्त मजूरीवर अवलंबून आहे. पण गेल्या दोन महिन्यापासन रोजंदारी मिळावी म्हणून गावकऱ्यांची भटकंती सुरु आहे.
हाताला काम नाही, त्यामुळे पोटाची खळगी कशी भरायची हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात टँकर पाणी
पुरवठ्यासाठी टँकर येतोय. गावात रोजगार नसल्यानं वाड्या तांडे रिकामे होतात. ब्राम्हणगाव तांड्यावरील 40 जोडप्यांनी गाव सोडलं आहे.
ऐन पावसाळ्यात जलसाठे कोरडे पडत आहेत. मराठवाड्यातील 79 मध्यम प्रकल्पात केवळ 40.03 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा असून जायकवाडीत 50 टक्के तर माजलगाव धरणात 6 टक्के इतकंच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पावसानं एक-दोन दिवसात कृपा केली नाही, तर मराठवड्याला भर पावसाळ्यात दुष्काळ पहावा लागणार आहे.
पावसाळ्यात मराठवाडा कोरडाठाक पडला आहे. अशावेळी उन्हाळ्याची कल्पनाही करवत नाही. इतकं भीषण संकट तोंडासमोर असताना देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)