एक्स्प्लोर
VIDEO : औरंगाबादेत वाहतूक पोलिस-दुचाकीस्वाराची हाणामारी

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये वाहतूक पोलिस आणि दुचाकीस्वारामध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला हटकल्याने तरुणांनी अरेरावी केल्याचा आरोप आहे. मंगळवारी औरंगाबादच्या आकाशवाणी चौकात ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवलं. मात्र या तरुणांनी पोलिसांसमोर अरेरावी सुरु केली. इतकंच नाही, तर त्यांनी वाहतूक पोलिसांवर हातही उचलल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनाही या तरुणांना चांगलाच धडा शिकवला. विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. हाणामारीच्या प्रकारानंतर दोन तरुण पळून गेले आहेत. पोलिसांकडून या तरुणांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तसंच त्यांची दुचाकीही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























