एक्स्प्लोर
मुलगी नाही, दुसराही मुलगाच झाला! आईने बाळाचा जीव घेतला
दोन मुलगे झाल्यामुळे पुढे मुलीसाठी कुटुंबीय नकार देतील, या भावनेतून महिलेने चिमुकल्या मुलाचं आयुष्य संपवलं.
औरंगाबाद : मुलगी नको म्हणून गर्भातच तिचा बळी घेतल्याचे प्रकार घडले आहेत, मात्र औरंगाबादेत 'मुलगा नको' या मानसिकतेतून दहा महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बिडकीन येथील पैठणखेडा गावात दहा महिन्याच्या चिमुरड्याची जन्मदात्रीनेच पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आधीच एक मुलगा असल्यामुळे दुसरं अपत्य मुलगीच व्हावी, अशी महिलेची इच्छा होती. दोन मुलगे झाल्यामुळे पुढे मुलीसाठी कुटुंबीय नकार देतील, या भावनेतून तिने चिमुकल्याचं आयुष्य संपवलं.
आरोपी महिला आपल्या वडिलांकडे राहायला आली होती. रात्री झोपल्यावर दहा महिन्यांचा प्रेम अचानक घरातून गायब झाल्याचा कांगावा तिने केला. इतकंच नाही, तर पोलिसात अपहरण झाल्याची तक्रारही तिने दिली. मात्र पोलिसांना एकूणच परिस्थिती पाहून संशय आला.
श्वान पथकाच्या साहाय्याने पोलिसांनी शोध घेतला असता घरातच एका ड्रममध्ये चिमुकल्या प्रेमचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घरातील सगळ्यांनाच ताब्यात घेतलं असता महिलेने गुन्ह्याची कबुली दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement