एक्स्प्लोर
औरंगाबाद पालिकेने 12 कोटी थकवले, महावितरणकडून वीज खंडित
गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेनं 12 कोटी 82 लाख रुपयांचं वीज बिल थकवलं होतं.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये महावितरणनं वीज कनेक्शन तोडल्यानंतर औरंगाबाद महापालिकेला जाग आली आहे. थकित 12 कोटींपैकी दोन कोटी रुपये भरल्यामुळे तूर्तास पाणीकपातीचं संकट टळलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेनं 12 कोटी 82 लाख रुपयांचं वीज बिल थकवलं होतं. यासंदर्भात महावितरण कंपनीनं पालिकेला दोन नोटीस बजावल्या. मात्र तरीही पालिकेनं वीज देयकाचा भरणा केला नाही. अखेर औरंगाबाद महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महावितरणकडून तोडण्यात आला. त्यामुळे औरंगाबादकरांवर 'पाणीबाणी' निर्माण झाली. त्यानंतर पालिकेनं 12 कोटींपैकी दोन कोटींचं बिल भरलं. तूर्तास औरंगाबादवासियांवरील पाणीकपातीचं संकट टळलं आहे. मात्र आज सहा तास उशिरा पाणी पुरवठा होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























