एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कॅन्सरग्रस्तांसाठी आशेची 'किरण' मानसिक धीर देण्यासाठी लांबसडक केस दान
औरंगाबादमधील एका तरुणीने आपले केस कॅन्सरग्रस्तांसाठी विग बनवण्यासाठी दान केले. कॅन्सरपीडितांना होणारा त्रास पाहता आपल्या परिने काय मदत केली जाऊ शकते याचा विचार केला आणि टक्कल करुन आपले केस विगसाठी दान केले.
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये पत्रकारितेच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या किरण गीते या विद्यार्थिनीनं आपले लांबसडक केस कॅन्सरग्रस्तांसाठी दान केले आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केरळच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे टक्कल केलेले फोटो व्हायरल झाले होते. केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातील इरिंजलकुलदा येथे वरिष्ठ सिव्हिल पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अपर्णा लवकुमार यांचा हा फोटो होता. आपले केस त्यांनी कॅन्सर पीडितांसाठी विग बनवण्यासाठी कापले होते. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वच स्तरातून खूप कौतुक देखील झालं होतं.
ज्यावेळी त्यांच्याशी याबाबत बातचित करण्यात आली त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, "जे लोक कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला झुंज देतायत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मी हे केलं. माझ्या या उपक्रमातून आणखी कोणीतरी प्रेरणा घेईल आणि कँन्सरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावेल" आणि त्यांचं हे वाक्य अक्षरशः खरं ठरलं आहे. आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबादच्या किरण गीते या युवतीने यावरुन प्रेरणा घेतली. याच पावलावर पाऊल टाकत तिने आपले केस दान करुन कॅन्सरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
किरण गीते ही विद्यार्थिनी मुळची परभणी जिल्यातील जिंतूरची रहिवासी आहे. सध्या ती औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात पत्रकारितेच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. तिच्या एका मैत्रीणीला या आजाराने ग्रासले आहे. तिच्यासाठी आपण काहीच करु शकत नाही हा प्रश्न तिला अनेक दिवस छळत होता. एकदा आरशात पाहत असताना तिच्या मनात एक विचार मनात आला की, कॅन्सरच्या रुग्णांची केमो-थेरपी केली जाते आणि या थेरपीमध्ये त्यांचे केस मोठ्या प्रमाणात गळतात. आपण अशा रुग्णांचे शारीरिक त्रास तर कमी करु शकत नाही पण त्यांना मानसिक धीर देण्यासाठी आपले केस नक्कीच देऊ शकतो. हा विचार मनात आला त्याचक्षणी तीने केस दान करण्याचा निर्णय घेतला. किरणने रविवारी संध्याकाळी आपले केस कापले आणि एका पाकिटामध्ये व्यवस्थितरित्या पॅक करून पुण्यातील एका संस्थेला पाठवले. आता तिच्या केसांपासून विग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे किरण ही कॅन्सरग्रस्तांसाठी एक आशेची किरण बनली आहे.
आई-वडिलांची कौतुकाची थाप
आपली विशीतली मुलगी असा काहीतरी वेगळा विचार करतेय याचं किरणच्या आईवडिलांना फार कौतुक वाटलं. त्यांनी किरणला या उपक्रमासाठी पाठिंबा दिला. किरणचे वडील एस.टी चालक पदावरुन निवृत्त झाले आहेत. तर आई एस.टी. महामंडळात लेखनिक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement