Chhatrapati Sabhajinagar: तिकडे धनंजय मुंडेंना भेटल्यामुळे टीकेचे धनी, इकडे औरंगाबाद खंडपीठाची सुरेश धसांना नोटीस, काय प्रकरण आहे?
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: भाजप आमदार सुरेश धस यांनी धार्मिक कारणावरून मत मागितले. मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले. शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले. निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करूनही निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती पुरवली नाही अशा आरोपांखाली धस यांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली असून आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि निवडणूक आयोगाला (Election Commission) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे. (Mumbai Highcourt)
काय म्हटलंय याचिकेत?
सुरेश धस भारतीय जनता पक्षाकडून विजयी झाले होते त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये असे नमूद केले आहे की,
१. धस यांनी धार्मिक कारणांवरून मत मागितले.
२.मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले.
३. शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले.
४. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करून देखील 'फॉर्म 17' ची प्रत त्यांना दिली नाही.
५. निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओ ग्राफी तसेच सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करून देखील त्यांना पुरवले नाही.
६. यावरून निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराला झुकते माप देत होते असे दिसते.
असे आरोप या याचिकेत केले आहेत. या याची के वरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 05 मार्च रोजी होणार असून धस यांना कोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे. निवडणुकीत नियम भंग केल्याचे गंभीर आरोप याचिकेत करण्यात आले आहेत.
धनंजय मुंडेंना भेटल्यानंतर आज सुरेश धस मस्साजोगमध्ये
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज (22 फेब्रुवारी) मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात जोरदार राळ उडवून दिली. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याच धनंजय मुंडेंची दोन वेळा भेट घेतल्याचं उघड झाल्यावर सुरेश धस प्रचंड टीकेचे धनीही झाले. त्यानंतर आज सुरेश धस पहिल्यांदाच देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोग गावात पोहचले.
हेही वाचा:
























