एक्स्प्लोर
नवरात्रीनिमित्त तुळजाभवानी मंदिर रोषणाईने उजळले
तब्बल 25 हजार बल्बरुपी दिव्यांनी डिजिटल लाईटींगने यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव उजळून निघणार आहे.

तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर तुळजापूरच्या कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात लगबग सुरु झाली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासह परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुणे येथील संजय टोळगे व उंडाळे यांनी श्रध्देपोटी ही विद्युत रोषणाई केली आहे. शनिवारी संघ्याकाळी फटाक्याचा अतिषबाजीत या विद्युत रोषणाईचा शुभारंभ करण्यात आला. तब्बल 25 हजार बल्बरुपी दिव्यांनी डिजिटल लाईटींगने यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव उजळून निघणार आहे. यंदाचा शारदीय नवरात्रोत्सवात ही नेत्रदिपक आकर्षक विद्युत रोषणाई भक्तांसाठी आकर्षक ठरणार आहे. यंदा राजमाता जिजाऊ राजे शहाजी महाद्वार, गोमुख कुंड निंबाळकर दरवाजा, मुखगर्भगृह आणि भवानी शंकर तसेच होमकुंड या तिन्ही शिखरावर आणि मंदीर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भक्तांसाठी विधुत रोषणाई ठरते आकर्षणाचा केंद्र बिंदू ! गेल्य़ा सहा वर्षापासून श्रीतुळजाभवानी मंदिरात केली जाणारी विद्युत रोषणाई भक्तांन साठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिराच्या महाद्वारासमोर फोटो काढण्यासाठी तरुण वर्ग मोठी गर्दी करतात. म्हणूनच मंदिराचा महाद्वार तरुणांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला आहे.
Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















