एक्स्प्लोर
लातूरमध्ये पुन्हा अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजवर ATSची कारवाई, 38 सिमकार्ड जप्त
लातूर : लातूरमधल्या शामनगर भागात रात्री आणखी एका अनधिकृत एक्स्चेंजवर लातूर एटीएसनं छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी 38 सिमकार्ड आणि एक गेटवे मशीन ताब्यात घेतलं. तर याप्रकरणी लातूर पोलिसांनी हैदराबादेतल्या कुलबाग परिसरातून दोघांना अटक केली.
दोनच दिवसांपूर्वी लातूर पोलिसांनी अनधिकृत एसटीडी/आयएसडी सेंटरचा पर्दाफाश केला होता. या कॉल सेंटरच्या माध्यमातून सरकारला 16 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी लातूर पोलिसांनी दोघांना अटक केली होती.
या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शंकर बिरादारचा कारनामा समजल्यानंतर, पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. कारण या पठ्ठ्यानं घरात चक्क अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरु केलं होतं. या टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीनं चोरी छुपे आंतरराष्ट्रीय कॉल्स केले जायचे.
तर काल आणखी एका टेलिफोन एक्स्चेंजचा लातूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लातूर एटीएसने शामनगर येथील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजवर छापा टाकाला. यावेळी तिथून 38 सिमकार्ड आणि एक गेटवे मशीन पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. हे अनाधिकृत टेलिफोन एक्स्चेंज केरबवाले नावाचा व्यक्ती चालवत असल्याची माहिती मिळाली असून, लातूर एटीएसच्या कारवाईनंतर तो फरार झाला आहे.
दरम्यान, राज्यात अवैध टेलिफोन एक्स्चेंजची टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना असून, याचा राज्यात अनेक ठिकाणी तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या
लातूरच्या दुकलीकडून 16 कोटींचा चुना, बनावट टेलिफोन एक्स्चेंज
लातुरमध्ये अवैध STD सेंटरचा पर्दाफाश, पाकला लष्कराची माहिती पुरवल्याचा संशय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement