Dr. Pradip Kurulkar : पाकिस्तानला 'ती' माहिती पुरवलेल्या प्रदीप कुरुलकर यांना 15 मेपर्यंत ATS कोठडी
पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देण्याचा आरोप असलेले डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीत वाढ 15 मेपर्यंत करण्यात आली आहे.
Dr. Pradip Kurulkar : पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती (Pradip Kurulkar) देण्याचा आरोप असलेले डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या एटीएस कोठडीत वाढ 15 मेपर्यंत करण्यात आली आहे. कुरुलकर ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.
डॉ. प्रदीप कुरुलकर हे हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकले होते. त्याचबरोबर प्रदीप कुरुलकर डीआरडीओ गेस्ट हाऊसमधे अनेक महिलांना भेटत होते. त्याचाही तपास करण्याची गरज असल्याच एटीएसने न्यायालयात सांगितलं आहे. त्यांची आज एटीएस कोठडी संपली होती त्यामुळे त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी ते ईमेलद्वारे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. त्यांची एटीएस कोठडी वाढवण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर यांच्या बँक अकाऊंटमध्ये बाहेरच्या देशातून पैसै आले का?, याचाही तपास एटीएस कडून करण्यात येणार आहे. सरकारी पासपोर्टचा उपयोग करुन पाच ते सहा देशांना भेटी दिल्याचंदेखील एटीएस ला आढळून आलं आहे.
प्रदीप कुरुलकर यांनी डेटा डिलिट केला...
प्रदीप कुरुलकर यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला आहे. तो डेटा नक्की काय होता आणि तो त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर विभागाला दिला आहे का?, याचा तपास करण्याची गरज असल्याच एटीएसने न्यायालयात सांगितलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खाजगी पातळीवर पोहचला. या संवादरम्यान डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या ब्राम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागण्यात आली . त्याचबारोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती.