एक्स्प्लोर

Ashtavinayak Helicopter Service : आता हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा! भाविकांचा वेळ वाचणार 

Ashtavinayak Helicopter Service : गणेशभक्तांना एकाच वेळी  हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन मिळणार आहे.. कमीत कमी वेळात हे दर्शन होणार असल्यानं भाविकांना याचा फायदा होणार आहे.  

Ashtavinayak Helicopter Service : आता गणेशभक्तांना एकाच वेळी  हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन मिळणार आहे. हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक सेवा आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु झाली आहे. काल बुधवारी पाच गणेश भक्तांना घेऊन ओझरपासून ही सेवा सुरु झाली. ही सेवा लवकरच कायमस्वरूपी केली जाणार असल्याची माहिती ओझरचे माजी मुख्य विश्वस्त बबन मांडे यांनी दिली. काल बुधवारी, ओझर येथे आरती करुन या सेवेस शुभारंभ झाला. ओझरनंतर रांजणगाव, सिद्धटेक, मोरगाव, थेऊर, पाली, महड, लेण्याद्री असे मार्गक्रमण होणार आहे. अष्टविनायकाचे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दर्शन हा उपक्रम ओझर येथील विघ्नहर देवस्थानपासून सुरु करण्यात आला. या सेवेमुळं भाविकांना एकाच वेळी अष्टविनायकांचे दर्शन घेता येणार आहे. कमीत कमी वेळात हे दर्शन होणार असल्यानं भाविकांना याचा फायदा होणार आहे.  

महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारतातून जगभरातून गणेशभक्तांना एकदातरी अष्टविनायक गणपतीचे दर्शन व्हावे, अशी मनोकामना असते. प्रवासाची सर्व साधने उपलब्ध असून देखील वेळेअभावी अष्टविनायक दर्शनाचा लाभ काही भाविक घेऊ शकत नाही. ही भाविकांची मागणी लक्षात घेऊन ट्रस्टने भाविकांसाठी व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी कमीत कमी वेळेमध्ये अष्टविनायक दर्शन (परिक्रमा) पूर्ण होण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे दर्शन हा संकल्प प्रथम श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने सर्व अष्टविनायक देवस्थानच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत मांडली होती. यानंतर हेलिकॉप्टर द्वारे भाविकांना दर्शनाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला.  हेलिकॉप्टरसाठी प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे. 

अन् गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेली अष्टविनायक दर्शनाची हवाई सफरीची प्रतीक्षा संपली. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि सर्व अष्टविनायक देवस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या संकल्पनेतून बुधवारी हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शनाचा प्रारंभ झाला.

या हेलिकॉप्टरद्वारे दर्शनाचा पहिला मान विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बी. व्ही. मांडे, माजी अध्यक्ष वसंतराव पोखरकर, उद्योजक मीराताई पोखरकर, सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत, डॉ. पल्लवी राऊत यांना मिळाला.ही सेवा सुरु करताना महागणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगावचे विजयराज दरेकर, वरदविनायक देवस्थान ट्रस्टच्या मोहिनीताई वैद्य, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीचे धनंजय धारप, चिंतामणी देवस्थान ट्रस्टचे विनोद पवार, सिद्धिविनायक सिद्धटेक देवस्थान ट्रस्टचे मंदार देव, मयुरेश्वर देवस्थान ट्रस्ट मोरगावचे आनंद देव, गिरिजात्मक देवस्थान ट्रस्ट लेण्याद्रीचे सदाशिव ताम्हाणे व जितेंद्र बिडवई उपस्थित होते. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget