अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्याने काँग्रेससह 'महाविकास आघाडी'ला बसणार फटका
Ashok Chavan : महाविकास आघाडीत अशोक चव्हाण महत्वाचे नेते समजले जात होते. सोबतच काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका त्यांनी महाविकास आघाडीत वेळोवेळी मांडली होती.
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी बातमी समोर येत असून, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या पक्ष सदस्य पदासह विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे यासोबतच महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) देखील हा मोठा झटका समजला जात आहे. कारण महाविकास आघाडीत अशोक चव्हाण महत्वाचे नेते समजले जात होते. सोबतच काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका त्यांनी महाविकास आघाडीत वेळोवेळी मांडली होती. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीला मोठा धक्का असणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात ही चर्चा अधिक प्रमाणात सुरु होती. अशात आता अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट झाले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत पहिल्यापासून अशोक चव्हाण यांची भूमिका महत्वाची होती. महाविकास आघाडीच्या प्रत्येक महत्वाच्या बैठकीत अशोक चव्हाण हजर राहत होते. त्यामुळे महाविकास आघाडीला टिकवण्यासाठी चव्हाण यांची देखील महत्वाची भूमिका होती. मात्र, आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने महाविकास आघाडीला हो मोठा धक्का समजला जात आहे.
राजीनामा आजच स्वीकारला जाणार...
अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा आजच स्विकारला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर, चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु, इतर आमदार लगेच राजीनामा देणार नसल्याची सुत्रांची माहीती आहे. तसेच, अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याने त्यांनी आजच राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया...
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील प्रतिक्रिया येत आहेत. चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला का नाही हे माहीत नाही. मात्र काँग्रेसच्या राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. कुणा एका व्यक्तीच्या पक्षातून जाण्याने त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. अशोक चव्हाण एकटे गेले का त्यांच्यासोबत किती आमदार आहेत याची माहिती नाही. मात्र, जर भाजप म्हणत असेल की आम्ही यावेळी चारसो पार आहोत तर मग तुम्हाला दुसऱ्या पक्षाचे नेत्याची गरज का पडते? असे चव्हाण म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Ashok Chavan Resign: अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची प्रत माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय म्हटले?