एक्स्प्लोर

पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण अडखळले, फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले!

Ashok Chavan BJP : देवेंद्र फडणवीस यांनी चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.

मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan BJP) यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या पहिल्याच भाषणात बोलतांना अशोक चव्हाण अडखळले. तर, भाजप मुंबईचे अध्यक्ष असे उल्लेख करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष इथे उपस्थित असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले. पण, आपली चूक लक्षात येताच अशोक चव्हाणांनी सावरासावरी केली.

नेमका काय घडलं? 

मुंबईच्या भाजप कार्यालयात आज अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी सुरवातीला अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल टाकून आणि बुके देऊन चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष प्रवेशाची माहिती दिली. पुढे अशोक चव्हाण यांनी बोलायला सुरवात केली. मात्र, भाजप मुंबईचे अध्यक्ष असे उल्लेख करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष इथे उपस्थित असल्याचा उल्लेख केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला. तर, अशोक चव्हाण यांनी देखील पहिलाच दिवस असल्याचे म्हणत सावरासावरी केली.

अशोक चव्हाण काय म्हणाले? 

आम्ही विरोधात आणि सत्तेत असतांना देखील आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. विकासाची आम्ही नेहमी साथ दिली.  38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. राज्यासाठी काम करतांना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. गेल्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवीन सुरूवात करतोय. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सकारात्मक आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेल. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करणार आहे. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास करत आहेत. मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

हा माझा व्यक्तिगत निर्णय...

सभागृहात मी विरोधकाची भूमिका प्रामाणिकपणे मांडली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी संबंध होते. ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मला कुणी जा असे सांगितले नाही, असा खुलासा देखील चव्हाण यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ashok Chavan: बावनकुळेंनी फॉर्मवर सही केली अन् अशोक चव्हाण भाजपवासी झाले, कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget