एक्स्प्लोर

प्रताप पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील हे माझ्या नावाने बोंबलत फिरतात, अशोक चव्हाणांचा टोला, म्हणाले, मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न 

महायुतीतील मित्रपक्षांसह विरोधकांकडून मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत खंत व्यक्त केली आहे.

Ashok Chavan Nanded : महायुतीतील मित्रपक्षांसह विरोधकांकडून मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत खंत व्यक्त केली आहे.  नांदेडच्या हिमायतनगर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त केली. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध इतर सर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. पण मला विश्वास आहे की जनता मला या चक्रव्यूहातून बाहेर काढेल, असेही अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यावर टीका केली. हे माझ्या नावाने बोंबलत फिरतात. माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप लागत नाही, असेही ते म्हणाले.

 पाणी पाजण्याचं काम तुमचंच आहे, गुलाबराव पाटलांना चव्हाणांचा टोला

भाजपच्या जाहीर सभेतून अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यावर टीका केली. हे माझ्या नावाने बोंबलत फिरतात. माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप लागत नाही, अशी टीका चव्हाण यांनी दोन्ही नेत्यांवर केली. दरम्यान, मुदखेड येथील शिवसेना (शिंदे गट) सभेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरातील पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, की, पाणी पाजण्याचं काम तुमचंच आहे. जिल्ह्यात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत तुम्ही किती कामे केली? राज्यात ही कामे रखडली आहेत. प्रचार संपल्यानंतर तरी कृपा करून लोकांना पाणी पाजण्याचं काम करा, असा टोला अशोक चव्हाण यांनी पाटील यांना लगावला.

नेमकं काय म्हणाले होते हेमंत पाटील?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका सुरु आहेत. याच निवडणुकांवरुन राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडमध्येही राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळालं. नांदेड जिल्हयात सगळे पक्ष आपल्या मर्जीने चालावे ही अशोक चव्हाण यांची भूमिका आहे. पैशांचा वापर करुन कार्यकर्त्यांची जमात नष्ट करण्याचा त्यांचा जुना प्रयोग असल्याची टीता आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली.  अशोक चव्हाण यांनीच युती तोडली, युती तुटण्यास तेच 100 टक्के जबाबदार आहेत असेही ते म्हणाले होते. 

महत्वाच्या बातम्या:

युती तोडण्यास अशोक चव्हाण हेच जबाबदार, शिवसेना आमदाराचे आरोप, नांदेडमध्ये महायुतीत ठिणगी! 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget