एक्स्प्लोर

'...त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे, हे मी नेहमी मानतो'; राज ठाकरेंचं ट्विट, जातीपातीच्या राजकारणावरही बोलले!

Ashadhi Ekadashi 2024: महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

Ashadhi Ekadashi 2024: आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची (Pandharpur) नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा (Shri Vitthal Rukmini Mahapuja) संपन्न झाली. राज्यातील नागरिकांसह राजकीय नेते मंडळी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी देखील ट्विट करत महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे, असं साकडं विठ्ठलाकडे मागितलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली 8 शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. 'यात्रा' ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्यादेखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं, असं राज ठाकरे म्हणाले. 

मूठभरांच्या नादी लागून महाराष्ट्र विस्कटत चाललांय- राज ठाकरे

देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेव्हा अगदी 7, 8 वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर 'महा'राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

राज ठाकरेंचं ट्विट-

राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे; मुख्यमंत्र्यांचं साकडं

मी विठ्ठलाकडे नेहमी जनतेसाठी बळीराजासाठी मागणं मागत असतो. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी होई दे हे मागणं बळीराजाकडे मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज सळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं, असं साकडं एकनाथ शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं त्यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget