भरत गोगावलेंच्या सूचनेसह महिला मंत्री म्हणून आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्री करा; जयंत पाटलांकडून भाजपची कोंडी
Jayant Patil : आज सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil ) यांना जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

Jayant Patil : आज सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil ) यांना जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांसह (Sudhir Mungantiwar) मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना टोला लगावला. सुधीर मुनगंटीवार तुमचे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. तुमच्या ओळखीचा फायदा करुन रायगडच्या पालकमंत्री पदाचा मार्ग काढा आणि महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांची नियुक्ती करा. भरत गोगावले यांच्या सूचनेसह त्यांची नियुक्ती करा असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
माझ वजन असतं तर मी इथं भाषण देत बसलो नसतो : सुधीर मुनगंटीवार
दरम्यान, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील पलटवार केला. माझ वजन असतं तर मी इथं भाषण देत बसलो नसतो. पुढे बसलो असतो असे मुनगंटीवार म्हणाले. त्याचबरोबर भरत गोगावले यांनी देखील जयंत पाटील यांना टोला लगावला. चालले का तुम्ही आगीत तेल ओतून, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं. तर जयंतराव तुम्ही असे मुद्दे मांडत राहिला तर मला नंतर पुरुष दिनही साजरा करावा लागेल असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत नाराजीनाट्य
दरम्यान, सध्या रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत नाराजीनाट्य असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी याला जोरदार विरोध केला. मंत्री भरत गोगावले यांनाच रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री करावं, अशी मागणी होत होती. त्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात देखील गिरीश महाजन यांना पालमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता नवीन नियुक्त्या कधी होणार? पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. भरत गोगावले यांनी मीच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या कोकणातील सर्व आमदारांनी देखील गोगावले यांनाच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करावं अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Raigad & Nashik Guardian Minister : भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा तिढाही सोडवणार!






















