एक्स्प्लोर
भिंतीला भगदाड पाडून मणप्पूरम फायनान्समधून 30 किलो सोनं लंपास
उल्हासनगर : उल्हासनगरमधील कॅम्प 4च्या मणप्पूरम गोल्ड फायनान्समधील तब्बल 30 किलो सोन्यावर चोराने डल्ला मारला. ऑफिसच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्याने सोनं लंपास केल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी ऑफिस उघडल्यावर ही घटना उघडकीस आहे. रविवारी रात्री ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
विठ्ठलवाडी पोलिसांसह गुन्हे शाखा घटनास्थळी पोहोचली. अप्पर पोलिस आयुक्त शरद शेलार, पोलिस उपायुक्त सुनिल भारद्वाज, सहाय्यक पोलिस आयुक्त विकास टोटावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.
मणप्पूरम फायनान्सच्या या ऑफिसमध्ये 30 किलो सोनं होतं का, याचाही तपास सुरु आहे. तसंच पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात केस दाखल केली आहे.
व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement