एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करणं गरजेचं, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सज्ज, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

CM Eknath Shinde : आज मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या डिझास्टर कंट्रोल रुममध्येही जाऊन आढावा घेतला. नालेसफाईवरून आज राजकारण करण्याची वेळ नाही, तर आज लोकांना मदत करण गरजेच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Eknath Shinde : कालपासून मुंबईत मोठा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पण याकाळात मुंबई महापालिकेनं सकाळपासून चांगलं काम केलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. नालेसफाईवरून आज राजकारण करण्याची वेळ नाही, तर आज लोकांना मदत करण गरजेच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एनडीआरएफ टीमशीही मी बोललो आहे. याशिवाय आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यांनाही सज्ज राहण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी राज्याच्या डिझास्टर कंट्रोल रुममध्येही जाऊन आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

सकाळी जिथं पाणी साचलं होतं तिथं आता रस्ते आणि रेल्वे सुरु 

आज आम्ही 5 हजार हॉटस्पॉट शोधून काढले आहेत. तिथं पालिकेचे अधिकारी तैनात केले आहेत. आता पाण्याचा निचरा सुरू झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सकाळी जिथं पाणी साचलं होतं तिथं आता रस्ते आणि रेल्वे सुरु झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सगळेजण मिळून काम करत आहेत. पालिका, रेल्वे, राज्य सरकार असेही मुख्यमंत्री म्हणाले. मोगरा, माहुल इथ नवे पंपिंग स्टेशन सुरू होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मिठी नदी, पोयसर नदी यांची भिंत आणखीन थोडी वाढवण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरुन नजीकच्या वस्त्या जलमय होणार नाहीत असेही मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय नद्यांना फ्लडगेट सुद्धा बसवले जात असल्याचे शिंदे म्हणाले. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

राजकारण करण्याची वेळ नाही, मुख्यमंत्र्यांना मदत करणं गरजेचं

सातही पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाली आहेत. पाणी तुंबण्याची ही समस्या कायमची संपणार आहे. कोकणात एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नालेसफाईवरून आज राजकारण करण्याची वेळ नाही, तर आज लोकांना मदत करण गरजेचं असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

मुंबईत काल रात्रीपासून 267 ते 300 मीमी पाऊस पडला

मुंबईत काल रात्रीपासून 267 ते 300 मीमी पाऊस पडला आहे.  मुंबईत पाऊस 65 मीमी च्या वर झाला की पूरसदृश्य परिस्थिती तयार होते. पण पालिकेनं सकाळपासून चांगलं काम केलं आहे. 441 पंप मुंबईभरात सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हिंदमाता परिसरात तितकं पाणी साचलेलं नाही. तिन्ही रेल्वेमार्ग आता सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. 

महत्वाच्या बातम्या:

नालेसफाईचे आकडे फसवे, मुंबई महापालिकाचे अधिकारीच जबाबदार, पावसाच्या मुद्यावरुन आशिष शेलारांची टीका 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special ReportMNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Embed widget