एक्स्प्लोर
जम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याच्या जवानाला वीरमरण
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात महाराष्ट्रातील साताऱ्याचा जवान शहीद झाला आहे. दीपक जगन्नाथ घाडगे हे साताऱ्यातील बोरगावचे सुपुत्र होते.
दीपक घाडगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा आणि एक वर्षांची मुलगी असा परिवार आहे. शहीद दीपक यांचं पार्थिव उद्या (10 मार्च) संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहोचणार आहे. तर शनिवारी मूळगावात अंत्यसंस्कार होणार आहेत.
आज दुपारी 2 वाजता भारतीय चौक्यांवर आणि पुंछ सेक्टरमध्ये एलओसीजवळ पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. त्यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र यामध्ये 27 वर्षीय दीपक जगन्नाथ घाडगे यांचा वीरमरण आलं.
दरम्यान, दीपक घाडगे यांना निधनानंतर गावावर शोककळा पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement