Archana Patil Chakurkar join BJP : काँग्रेसमधील आणखी एक मोठं कुटुंब भाजपात दाखल; लातूरमध्ये मोठा राजकीय भूकंप!
Archana Patil Chakurkar join BJP : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Archana Patil Chakurkar join BJP : काँग्रेसला राज्यात आणखी एक मोठा धक्का बसला असून, माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे नेते शिवराज पाटील (Shivraj Patil) चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan), बसवराज पाटील यांच्यापाठोपाठ अर्चना पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkar) यांचा हा मोठा पक्षप्रवेश समाजाला जात आहेत. या प्रवेशामुळे मराठवाड्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या आणखी वाढणार आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होत आहे.
पेशाने डॉक्टर असलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे पाहायला मिळत होते. चव्हाण यांच्या प्रवेशानंतर लगेचच शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनीही भाजपात जाने पसंद केले. त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच बाबींच विचार करता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने पक्षात घेतले आहेत. विशेष म्हणजे अर्चना पाटील चाकूरकर या अमित देशमुखांविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे.
लातूर काँग्रेसला मोठा धक्का!
मागील अनेक वर्षांपासून देशमुख कुटुंबाचं लातूरच्या राजकारणात वर्चस्व पाहायला मिळते. मराठवाड्यात अशोक चव्हाण कुटुंब आणि देशमुख कुटुंब या दोन्ही कुटुंबाचे काँग्रेस पक्षात देखील मोठा दबदबा असल्याचे चित्र पाहायला मिळायचे. अशात काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे आता देशमुख कुटुंबाचे मराठवाड्यातील राजकीय वर्चस्व पाहता अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश महत्वाचा समजला जात आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत अमित देशमुखांविरोधात अर्चना पाटील चाकूरकर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे.
फडणवीसांनी दिलेली जबाबदारी 100 टक्के पार पाडणार...
भाजपमध्ये पक्षप्रवेश करतांना अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की, “मी गेली 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते. माझा हा राजकीय प्रवासाचा निर्णय आहे. मी आज हा श्री गणेशा आजपासून करत आहे. मोदी साहेबांचा प्रवास आम्ही बारकाईन बघत होतो. संसदेतले पहिले महिला विधेयक पारीत झालं, तो एक ऐतिहासिक निर्णय होता. आरक्षणामुळे महिलांना संधी मिळेल. देवेंद्र भाऊ तुम्ही जी जबाबदारी द्याल ती 100 टक्के पार पाडीन, असे अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या :