एक्स्प्लोर

महसूलमंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय! राज्यात 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती

राज्यातील 80 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश आज काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, तहसीलदारपदाचीही निवड देखील लवकरच होणार आहे.

मुंबई  : राज्यातील 80 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश आज काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, तहसीलदारपदाचीही निवड देखील लवकरच होणार आहे. दीड महिन्याआधी महाराष्ट्रात साठ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणीत देऊन त्यातील 34 अधिकाऱ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना तातडीने जात प्रमाणपत्रे मिळण्यास गती मिळाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसांच्या धडक कृती कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील रिक्त पदे भरली जाणार 

आजच्या पदोन्नती निर्णयामुळे विदर्भ व मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची अनेक रिक्त पदे भरण्यात आली आहेत. महसूल विभागातील एकाच ठिकाणी अनेक वर्ष राहण्याचा पायंडा या बदली व पदोन्नतीमुळे बदल्यात आला. दुर्गम भागात अनेक वर्ष राहिलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई, पुणे या शहरातही बढती व बदली देण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी पदांवरील नेमणुकीमुळे आता महसूल विभागातील जिल्हास्तरीय सुनावण्या मोठ्या प्रमाणात होऊन त्यांचा निपटाराही होईल. 

संपूर्ण बढत्यांमध्ये पारदर्शकता

चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री झाल्यापासून महसूल विभागातील आस्थापनाविषयक अनेक प्रलंबित कामे झपाट्याने मार्गी लागले आहेत. या संपूर्ण बढत्यांमध्ये पारदर्शकता आहे. वर्षानुवर्षे बढत्या होत नसल्यामुळे उपजिल्हाधिकारी वर्गात शिथिलता आली होती आजच्या या आदेशाने अधिकारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे निवड श्रेणी पदी नियुक्तीचे आदेश देण्यात आले. जात पडताळणी समितीवर महाराष्ट्रभर अध्यक्ष नेमण्यात आले. उपजिल्हाधिकाऱ्यांनाही निवड श्रेणीचा दर्जा देण्यात आला तसेच आज उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती देऊन त्यांची पदस्थापना ही करण्यात आली. 

महसूल विभागात गेल्या 15 ते 19 वर्षापासून उपजिल्हाधिकारी पदांवरील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली नव्हती. एकाच पदावर अनेक वर्षे काम केल्याने येणारा तोच तोपणा या निर्णयाने निघून, महसूल विभागात नवचैतन्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक पदे रिक्त होती. या निर्णयामुळं आता विदर्भ व मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची अनेक रिक्त पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात अनेक वर्ष राहिलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई, पुणे या शहरातही बढती व बदली देण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

राज्यात पुन्हा खांदेपालट, पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget