(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोकरीसाठी कायपण! चौथी, सातवी पास अहर्तेच्या भोजनसेवक पदासाठी उच्चशिक्षितांचे अर्ज, नोकर भरती ठप्प असल्याचा परिणाम
विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षापासून शासनाच्या विविध विभागातील नोकर भरती प्रक्रिया जवळपास बंद आहे. यामुळं मिळेल ती नोकरी करायला युवक प्राथमिकता देत आहेत.
नांदेड: कोरोनासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षापासून शासनाच्या विविध विभागातील नोकर भरती प्रक्रिया जवळपास बंद आहे. तर विविध औद्योगिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणांच्या कोरोना काळात नोकऱ्या गेल्या आहेत.त्यामुळे लाखो तरुण तरुण बेरोजगार होऊन रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय.त्यामुळे परिणामी सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी मिळेल ती नोकरी व काम करण्याची तयारी आहे. त्यातूनच राज्य राखीव पोलीस बलात भोजनसेवक व सफाई कामगार या वर्ग चारच्या पदासाठी इयत्ता चौथी व सातवी अशी शैक्षणिक अहर्ता आहे पण या पदासाठी चक्क उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत. एकट्या नांदेड तालुक्यातून 1हजार 665 तर नांदेड जिल्ह्यातून जवळपास 2 हजार 700 अर्ज आले असल्याची माहिती नांदेड जिल्हा टपाल कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस बलात ऑफलाईन पद्धतीने ही सरळसेवा पद भरती होणार आहे.
राज्यात एसआरपीएफच्या चतुर्थ श्रेणी वर्ग चार गट ड यातील भोजनसेवक व सफाईगार या पदासाठी ही सरळ सेवा भरती घेतली जात आहे.पुणे ,दौड, जालना, मुंबई,हिंगोली,औरंगाबाद,गोंदिया,कोल्हापूर येथील जागांसाठी ही भरती होत आहे.ज्यात भोजनसेवकाच्या 94 तर सफाईगाराच्या 41 जागा काढण्यात आल्या आहेत.त्यातील 30 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर या पदासाठी सातवी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता मागण्यात आली आहे. परंतु वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येमुळे प्रत्यक्षात या चतुर्थ श्रेणीच्या पदासाठी पदवी, पदव्युत्तर,अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत.
हिंगोली राज्य राखीव पोलीस बल कार्यालयातील 7 जागेसाठी विविध जिल्ह्यातून आलेले अर्ज
एकूण-949
यात नांदेड जिल्ह्यातून खानसामा व सफाईगार या पदासाठी एकूण आलेले अर्ज-117
बी.ए -53 अर्जदार
एम.ए -16 अर्जदार
12 वी उत्तीर्ण-39 उमेदवार
10 उत्तीर्ण-9 उमेदवार
हिंगोली जिल्ह्यातून खानसामा व सफाईगार पदासाठी आलेले अर्ज एकूण-618
एम.ए.-59 उमेदवार
बी.ए-239 उमेदवार
अभियांत्रिकी-3 उमेदवार
7 वी इयत्ता-3 उमेदवार
चतुर्थश्रेणी पदासाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून हिंगोली पोलीस बलातील 7 जागेसाठी आलेले एकूण अर्ज-949 आहेत.
एम.ए. उच्चशिक्षित-432 उमेदवार
12 वी -436 उमेदवार
10 वी-81 उमेदवार
उच्चशिक्षितांनी केलेले हे अर्ज बेरोजगारीची तीव्रता विषद करत आहेत. तर शासनाच्या इतर विभागात कंत्राटी पद्धतीने निघालेल्या जागांवर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना घेण्या पेक्षा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रधान्य देण्यात येत आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI