एक्स्प्लोर

अन्वय नाईक प्रकरणावरून भाजपचा पलटवार, जुनी प्रकरणं उकरून काढली तर अडचणीत येईल सरकार

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाप्रमाणेच इतरही आत्महत्या प्रकरणं आम्ही उकरून काढली तर सत्तेत बसलेल्यांनी याचे काय परिणाम होतील ते समजून जावं असा गर्भित इशारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

मुंबई : अन्वय नाईक प्रकरणात ठाकरे सरकारनं रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर केलेल्या अटक कारवाईनंतर आता भाजपने आक्रमक रूप धारण केलं आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाप्रमाणेच इतरही आत्महत्या प्रकरणं आम्ही उकरून काढली तर सत्तेत बसलेल्यांनी याचे काय परिणाम होतील ते समजून जावं असा गर्भित इशारा भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

आज आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विट मध्ये पुन्हा इशारा दिला आहे की "...बात अभी और भी निकलेगी". शेलार पुढे सवाल करतायत की मराठी अस्मिता आणि कुटुंबाची ढाल करून रिया चक्रवर्ती आणि दिशा सालियान प्रकरणात बोलणाऱ्यांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न का केला जातोय. तसेच ठाण्यातील एका विकासकाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात लिहलेल्या सुसाईड नोट मध्ये कोणाची नावं होती याचाही शोध घेण्याचा इशारा भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी ट्विट मधून दिला आहे.

मात्र भाजपच्या या फक्त पोकळ धमक्या असून मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचं सरकार विरोधकांना तोंड द्यायला सक्षम असल्याचं शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं. तसेच ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्यामुळे अनेक ओबीसी भाजप आमदार नाराज असल्याचा सत्तार यांनी गौप्यस्फोट केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

खरंतर अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेनंतर भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करून निषेध नोंदवला. ठाकरे सरकार लोकशाहीची गळचेपी करत असल्याचा आरोप करत काळ्या फिती लावण्याच्या सूचना सर्व लोकप्रतिनिधींना दिला आहे. मात्र फक्त विरोध प्रदर्शनाने नाही तर एका आत्महत्या प्रकरणाचं उत्तर दुसऱ्या आत्महत्या प्रकरणाने देण्याची तयारी भाजप करत असल्याचं दिसत आहे.

दिशा सलियान आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणापासून सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा हा सामना आता थेट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणापर्यंत येऊन पोहचला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनी या दोन्ही आत्महत्या प्रकणात ठाकरे सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत होतं. मात्र सीबीआय चौकशी आणि एम्सच्या रीपोर्टमधून अद्याप कुठलाही असा पुरावा समोर आलेला नाही. पण 2018 सालच्या अन्वय नाईक प्रकरणात सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचा स्पष्ट उल्लेख असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा या आत्महत्या प्रकरणावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष उभा राहण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. इतकंच नाही तर यानिमित्ताने अनेक सापळे पुन्हा बाहेर निघण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाऊ लागली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget