(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : कारमध्ये फाईलआड तोंड लपवून पवारांच्या भेटीला पोहोचलेल्या नेत्याचं नाव समोर, अजित पवारांना आणखी एक धक्का!
who is person who hides his face in supriya sule car: मंगळवारी मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे, ही मोठी व्यक्ती कोण आहे, त्याची चर्चा आता रंगली आहे.
पुणे: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी गाठीभेटी, मुलाखती, दौरे,पक्षप्रवेश यांना वेग आला आहे, अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. अशातच काल(मंगळवारी) मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे, ही मोठी व्यक्ती कोण आहे, त्याची चर्चा आता रंगली आहे. मोदी बागेतून सुप्रिया सुळेंच्या गाडीत जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा फाईलने लपवला होता. याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत, फाईलने तोंड लपवलेला हा नेता माजी मंत्री राजेंद्र शिंगणे असल्याची चर्चा आता सुरू आहे. (who is person who hides his face in supriya sule car watch video)
सुप्रिया सुळेंच्या गाडीतून जाताना चेहरा लपवणारा ‘तो’ नेता कोण?#supriyasule #SharadPawar #ncp pic.twitter.com/6DDUzdhSqV
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) October 9, 2024
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वाटेवर असल्याची चर्चा आहे. काल(मंगळवारी) सोशल मीडियात सुप्रिया सुळे यांच्या गाडीतील चेहरा लपवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओ मधील स्वतःचा चेहरा फाईलने लपवणारी व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजेंद्र शिंगणे अजित पवार यांची साथ सोडून तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. नुकतीच शिंगणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत देखील दिली आहे.
बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजाने अजितदादांसोबत गेलो
काही दिवसांपुर्वी वर्ध्यामध्ये बोलत असताना आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत का गेलो याचं कारण सांगितलं होतं, यावेळी बोलताना मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील", अशी कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात असलेल्या आमदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली होती, आता पुन्हा ते शरद पवारांसोबत येतील अशी चर्चा आहे.
राजेंद्र शिंगणे सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार
राजेंद्र शिंगणे हे सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2023 मध्ये अजित पवारांनी शरद पवारांना सोडून महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत गेले. गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अडचणींमुळे लोक महायुतीसोबत गेले, असा आरोप करत होते. राजेंद्र शिंगणे यांना आरोपांना अप्रत्यक्षपणे कबुलीच दिली.