Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे समजते
Rashmi Shukla : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे समजते. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा टेलिग्राफ कायद्यांतर्गत नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना (Pune Police) निर्देश देण्यात आले आहेत. रश्मी शुक्लांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान रश्मी शुक्ला यांनी राजकीय सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले की, शुक्ला हे एसआयडीचे प्रमुख असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे फोन टॅप केले. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 166 आणि टेलिग्राफिक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अटकेपासून संरक्षण
दरम्यान, रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना (Pune Police) निर्देश देण्यात आले आहेत. रश्मी शुक्लांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान रश्मी शुक्ला यांनी राजकीय सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप
रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी निशाणा साधला होता. याप्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.
Maharashtra Budget Session LIVE: अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले