एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदीजी, आता आमची दुसरी मागणी मान्य करा: अण्णा हजारे
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 500 आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
"पंतप्रधान मोदींचा हा निर्णय क्रांतीकारक आहे. त्याबाबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. मोदींनी टाकलेल्या या पावलामुळे काळा पैसा बाहेर पडेल, देशाची प्रगती होईल" असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी आम्ही देशहितासाठी 500 आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घाला अशी मागणी केली होती, असं अण्णांनी नमूद केलं.
या निर्णयामुळे बनावट नोटा, काळा पैसा बाहेर पडेल. अतिरेकी काळा पैसा आपल्याविरोधात वापरत होते, असं अण्णा म्हणाले.
सर्व राजकीय पक्षांच्या देणगीचं ऑडीट करा
"काळा पैसा परत पांढरा करु नये. त्यासाठी आमची दुसरी मागणी मान्य करावी. सर्व राजकीय पक्षांच्या देणगीचं ऑडीट करावं. राजकीय पक्ष २० हजारांच्या आतील देणग्यांचा हिशेब देत नाही. देणग्यांचं २० हजाराचे टप्पे करुन, बोगस नावं देऊन काळा पैसा पांढरा करतात. निवडणूक आयोगाने देणग्यांचं स्पेशल ऑडीट करावं", अशी मागणी अण्णांनी केली.
दोन हजाराच्या नोटेबाबत पुनर्विचार करा
दोन हजार रुपयाच्या नोटांत गडबड होण्याची शक्यता आहे. तो व्यावहार गरीब करत नाहीत. त्यात पुन्हा काळा पैसा तयार होईल, याबाबत पुनर्विचाराची गरज आहे, असंही अण्णा म्हणाले.
दोन हजार रुपयांपर्यंतचे अर्थिक व्यावहार रोख करावे त्यावरील व्यवहार चेकने करावे. त्यामुळं काळ्या पैशाला ब्रेक लागेल, असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement