एक्स्प्लोर
Advertisement
शिवाजी विद्यापीठातील इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला विरोध
शिवाजी विद्यापीठातील इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला विरोध होत आहे. हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा पवित्रा पुरोगामी संघटनांनी घेतलाय. तर, कीर्तनाचा कार्यक्रम घेणारच असं कोल्हापूर युवा सेनेनं म्हटलंय.
कोल्हापूर : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा शिवाजी विद्यापीठातला नियोजित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला आहे. तर कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला जशास तसं उत्तर देऊ असं कोल्हापूर युवा सेनेनं म्हटलं आहे. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा कार्यक्रम विद्यापीठात, नको अशी भूमिका अंनिस आणि पुरोगामी संघटनांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या एका वक्तव्यावरुन कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर वादात आहे.
माझा विशेष | इंदोरीकर महाराजांना टार्गेट केलं जातंय का?
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याला कोल्हापुरातील पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे. तर, दुसरीकडे कार्यक्रम घेणारच अशी भूमिका कोल्हापूर युवा सेनेनी घेतलीय. परिणामी पुरोगामी संघटना आणि कोल्हापूर युवा सेना आता आमने-सामने आल्या आहेत.
इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर उतरु, संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानचा इशारा
15 दिवसात गुन्हा दाखल करावा अन्यथा न्यायालयात जाणार -
कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना क्लीन चिट मिळाल्यानंतर आता पुन्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्य चिकित्सकांना नोटीस दिली आहे. इंदोरीकर महाराजांवर येत्या 15 दिवसात गुन्हा दाखल करावा अन्यथा थेट न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव अॅड रंजना गवांदे यांनी दिलाय. इतकेच नाही तर महाराजांनी वादग्रस्त विधान केलेल्या कीर्तनाचा व्हिडिओ देखील पुरावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आलाय. जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबिकर यांनी तक्रार मिळाल्यानंतर 48 तासांत तपास पूर्ण केला पाहिजे होता. मात्र, मुरंबिकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत जर गुन्हा दाखल केला नाही तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबिकर आणि इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याचे रंजना गवांदे यांनी नोटीस मध्ये सांगितले आहे.
वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर नसल्याचा अहवाल सायबर सेलने दिला होता. त्यामुळे पुरावे मिळत नाही तोपर्यंत महाराजांवर कारवाई करणार नसल्याचे पीसीपीएनडीटी(PCPNDT)समितीने स्पष्ट केले होते. मात्र, आता अंनिसने महाराजांच्या कीर्तनाचा व्हिडिओच जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलाय. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
Indurikar Maharaj | इंदोरीकरांच्या कोल्हापूरातील कार्यक्रमाला अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा विरोध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बातम्या
विश्व
Advertisement