Anil Parab on ST: पडळकर, सदावर्ते कुठे गेले? कुठं मांजर होऊन बसले? सदाभाऊ खोत 15 दिवस आझाद मैदानात झोपले; अनिल परबांकडून एसटी खड्ड्यात घालणाऱ्यांची पोलखोल
Anil Parab on ST: ताटाखालची मांजर होऊन गप्प बसलेत, आता त्यांच्यामध्ये हिम्मत नाही, अशा शब्दात अनिल परब यांनी केला. परब यांनी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची यांच्यावरही हल्लाबोल केला.

Anil Parab on ST: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आज विधान परिषदेमध्ये बोलताना एसटीच्या कारभारावरून अक्षरशः वाभाडे काढले. परब यांनी एसटी खड्ड्यात घालणाऱ्यांची पोलखोल करताना संचित तोटा दहा हजार 900 कोटींवर गेल्याचे सांगितले. एसटी तोट्यात जाण्याला फक्त राजकीय नेतृत्व सुद्धा जबाबदार नसून अधिकाऱ्यांचे सिंडिकेट सुद्धा याला जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी एसटीसाठी आंदोलन केलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सुद्धा कडाडून हल्लाबोल केला. आता यांची वाचा कुठे गेली? एसटी कर्मचाऱ्यांना हे शासकीय कर्मचारी करणार होते, डंके की चोट पर करणार होते, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये घेतलं पाहिजे असं का वाटत नाही? ताटाखालची मांजर होऊन गप्प बसलेत, आता त्यांच्यामध्ये हिम्मत नाही, अशा शब्दात अनिल परब यांनी केला. परब यांनी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची यांच्यावरही हल्लाबोल केला.
सदाभाऊ खोत 15 दिवस आझाद मैदानात जाऊन झोपले होते
अनिल परब म्हणाले की, सदाभाऊ खोत 15 दिवस आझाद मैदानात जाऊन झोपले होते आणि म्हणाले होते की जोपर्यंत एसटी कर्मचारी शासकीय कर्मचारी होत नाही तोपर्यंत एसटीचे एक चाक बाहेर जाऊ देणार नाही म्हटले होते. परब यांनी याची आठवण करून देत पडळकर, गुणरत्न सदावर्ते आणि सदाभाऊ खोत यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या अगोदर पहिल्यांदा एसटी जगली पाहिजे. मात्र कर्मचाऱ्यांच्या गळ्यावर सूरी फिरवून तुम्ही एसटी मारल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. ते म्हणाले की बंद काळातील पाच महिन्यांचा पगार मिळाला नाही. यामुळे हजारो कर्मचारी कर्जबाजारी झाले. सगळ्यांनाच माहित आहे की एक महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना मिळाल तर ते सावकाराकडे जातात मात्र पाच महिने एसटी बंद ठेवण्याचे पाप या लोकांनी केल्याचा हल्लाबोल सुद्धा यांनी केला. ते म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्यात आले. त्यांना आमिष दाखवण्यात आली. त्यामुळेच पाच महिन्याच्या संप घडवून आणला. या लोकांनी पाच महिने एसटी बंद ठेवण्याचे पाप केल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या






















