एक्स्प्लोर

Anil Parab ED Raids Live : अनिल परबांच्या घरी ईडीचे छापे; मनी लाँड्रिंग प्रकरणी एकूण 7 ठिकाणी छापे

ED Raids On Shiv Sena Leader Anil Parab : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी ईडीची छापेमारी. मनी लाँड्रिंग प्रकरणी एकूण 7 ठिकाणी छापे.

Key Events
Anil Parab ED Raids Live Updates: Maharashtra Transport Minister Shiv Sena PMLA Case Marathi News Anil Parab ED Raids Live : अनिल परबांच्या घरी ईडीचे छापे; मनी लाँड्रिंग प्रकरणी एकूण 7 ठिकाणी छापे
ED Raids On Shiv Sena Leader Anil Parab

Background

ED Raids On Shiv Sena Leader Anil Parab : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. त्यानंतर अनिल परब यांनी बॅग भरण्याची तयारी करावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया सोमय्या यांनी व्यक्त केली. त्यानंतर आता ईडीकडून अनिल परब यांना अटक होणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनिल परब यांना अटक झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अनिल परब हे महत्त्वाचे नेते आहेत. 

>> अनिल परब शिवसेनेसाठी महत्त्वाचे का?

मागील अनेक वर्षांपासून अनिल परब शिवसेनेत सक्रिय आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे समजले जातात. मुंबई महापालिका निवडणुकांच्यादृष्टीने अनिल परब यांची महत्त्वाची भूमिका असते. अनिल परब हे अनेक वर्ष शिवसेनेप्रणित केबल सेनेचे अध्यक्ष होते. 

अनिल परब यांची मुंबईतील वॉर्ड निहाय समीकरणावर विशेष पकड आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेच्या रणनीतीमध्ये परब यांची मोठी भूमिका असते. 

मागील 2017 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. राज्यातील सत्तेत एकत्र असताना शिवसेना आणि भाजपने ही वेगवेगळी निवडणूक लढवली होती. काही समीकरणे शिवसेनेच्या विरोधात असतानाही शिवसेनेने ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीच्या विजयात अनिल परब यांचा मोठा वाटा होता.

अनिल परब यांना पक्षाकडून 2012 मध्ये विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते. त्याआधी वांद्रे येथील पोटनिवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव करण्यात परब यांची मोठी भूमिका होती. परब हे 2017 मध्ये शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते झाले होते. त्यानंतर त्यांना पक्षाने पुन्हा 2018 मध्ये विधान परिषदेवर पाठवले.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अनिल परब यांना परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली.

>> शिवसेना लक्ष्य?

केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेचे काही मातब्बर नेतेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  

12:29 PM (IST)  •  26 May 2022

Anil Parab Update : अनिल परब यांचा निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीही सकाळी सहा वाजेपासून ED अधिकाऱ्यांकडून रेड

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा निकटवर्तीय असलेले अंधेरी पश्चिम शिवसेना विभाग संघटक संजय कदम यांच्या घरी सुद्धा आज सकाळी सहा वाजेपासून ED अधिकाऱ्यांकडून रेड सुरू आहे. संजय कदम यांच्या घरी ED ची रेड ची माहिती मिळताच आता हळूहळू शिवसैनिक संजय कदम यांचा घराखाली जमा व्हायला सुरुवात झाले आहेत. 

11:58 AM (IST)  •  26 May 2022

Sanjay Raut on Anil Parab ED Action : अनिल परबांवरील ईडी कारवाईवरुन संजय राऊतांचा संताप; म्हणाले...

Sanjay Raut On Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री  अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनिल परबांची बाजू घेताना म्हटलं आहे की,  अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. याच प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहेत. त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहेत. परंतु त्यांच्यावर कोणी हात लावत नाही. आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असं राऊत म्हणाले. 

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget